अति उच्च तापमानाशी जुळवून घेणारे उंट सामान्यतः वाहतुकीसाठी वापरले जातात. पण सध्या वेगळ्याच कारणामुळे उंटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरत आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती एका उंटाला चक्क दुचाकीवर बसवून घेऊ जात आहे. हे दृश्य पाहणे देखील अत्यंत वेदनादायक आहे कारण उंटाला ज्या पद्धतीने बाईकवर बांधले ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

इंस्टाग्रामावर Jist News वर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती उंटाला मोटार सायकलवर बसवून घेऊन जात आहे. या व्हिडीओमध्ये उंटाचे पाय क्रूरपणे दुमडलेले आणि बांधलेले असल्याने बाईक-राइड दरम्यान तो ओरडत असल्याचे देखील दिसते आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत निश्चित माहिती नाही पण व्हिडिओमधील साइन बोर्डवर अरबी भाषा दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दुचाकीवर उंट घेऊन जाणाऱ्या दोन व्यक्तींचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.पण, हा व्हिडिओ केव्हा आणि कुठे रेकॉर्ड केला गेला याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही,” इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये वाचले आहे.

हेही वाचा – चंद्राच्या प्रकाशात उजळले केदारनाथ धाम मंदिर! आनंद महिंद्रांना आवडला सुंदर फोटो, तोंड भरून केले कौतुक

एका वापरकर्त्याने प्राण्यांना अत्यंत क्रूर वागणूक दिल्याबद्दल दोन्ही व्यक्तींची निंदा केली आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की,”त्यांनी त्याचे पाय कसे दुमडले आहेत ते पहा आणि बाईकवर जबरदस्तीने बसविण्यासाठी सामानासारखे अनैसर्गिकरित्या कठोरपणे त्याला बांधले आहे.” “या माणसांना बाईकला बांधून ओढून नेले पाहिजे.

तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ तो उंट या माणसांना दूर कुठेतरी फेकत आहे हे दृष्य मला पाहायचे आहे. “उंट मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसते,” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे.

हेही वाचा – पाकिस्तानी पॅराग्लायडरने तर हद्दच केली राव! लँडिग करताना अंदाज चुकला अन् थेट…. थरारक Viral Video एकदा बघाच

प्राण्यांसह क्रूर वागणूक दिल्याच्या आणखी एका प्रकरणात, रामायणातील राक्षसाची भूमिका करणाऱ्या थिएटर अभिनेत्याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ओडिशात अटक करण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने स्टेजवर डुकराचे पोट फाडले आणि प्रदर्शनादरम्यान त्याचे कच्चे मांस खाल्ले.

Story img Loader