scorecardresearch

दोन तोंड, तीन पायांचा ‘हा’ कसला विचित्र प्राणी? व्हायरल Video पाहून नेटकरी झाले थक्क

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील प्राणी लाकूड खात असल्याचं पाहायला मिळत आहे

viral ant eater video
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्राण्याचा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Photo : Twitter)

पृथ्वीवर असे अनेक विचित्र प्राणी आहेत, ज्यांच्याबद्दल आपणाला काही माहिती नसते. सध्याच्या डिजीटल जमान्यात आपणाला अनेक विविध प्रकारचे प्राणी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता येतात. जे आपल्या भागात किंवा प्रदेशात दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा नवीन प्राणी पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो आणि प्राण्यांमधील विविध प्रजाती पाहून आपण अनेकदा आश्चर्यचकित होतो.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्राण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवाय व्हिडीओतील प्राणी कोणता आहे आणि त्याचे नाव काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

हेही पाहा- फळे, भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाता? तर मग ग्राहकाच्या फसवणूकीचा हा Video बघाच

लाकूड खाणारा प्राणी –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक विचित्र प्राणी दिसत आहे. या प्राण्याला तीन पाय असून तो लाकूड खात असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा प्राणी तीन पायांवर उभा आहे तर त्याचे तोंडही पूर्णपणे वेगळे आहे. तो एक लांब लाकूड खात असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. हा प्राणी पाहिल्यानंतर अनेकांना तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हा प्रश्न पडला आहे.

हेही पाहा- …अन् चक्क सापाने मारली माकडासारखी उडी, IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video पाहून नेटकरी झाले थक्क

कोणता आहे हा प्राणी ?

हा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना युजरने लिहिले आहे की, ‘मी खूप गोंधळलो आहे की नक्की हे काय आहे?’ तर आतापर्यंत हा व्हिडीओ चार कोटी लोकांनी पाहिला आहे. तर २० हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिलं आहे की, ‘तीन पाय आणि दोन तोंडे, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. हा मुंगी खाणारा प्राणी असून तो दक्षिण अमेरिकेत आढळतो.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:08 IST