Shocking video: सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हसवतात तर काही व्हिडीओ रडवतात. दरम्यान, यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ हे हाणामारीचे असतात. ही भांडणं शुल्लक कारणावरून सुरू होऊन नंतर अतिशय हिंसक वळण घेतात. अशाच एका शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या कारणावरून भांडण झाले ते कारण ऐकून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिक महाडिक हे बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी घेण्यासाठी गेले होते. मात्र, दुकानदाराने कमी बिर्याणी दिल्यावरून ते दुकानदाराशी वाद घालू लागले. यामध्ये आरोपी वेदांत गायकवाड या १९ वर्षीय तरुणाने मध्ये पडून माजी सैनिकास बेदम मारहाण केली. रायगड जिल्ह्यातील पाली येथे ही घटना घडली असून याचा व्हिडोओदेखील समोर आला आहे. माजी सैनिक महाडिक आपल्या मुलांसोबत बिर्याणी घेण्यासाठी एका दुकानात गेला होता, सुरुवातीला माजी सैनिक आणि हॉटेल मालकामध्ये बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला. काही वेळाने वाद शांतदेखील झाला. पण, तेवढ्यातच दुसरा तरुण तेथे आला आणि त्याने त्या माजी सैनिकाला बेदम मारहाण केली. या मारामारीत माजी सैनिक जखमी होऊन खाली पडताना आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर त्याच्याबरोबर असलेली त्याची मुलं मात्र आपल्या वडिलांना पाहून रडताना मदत मागताना दिसत आहेत. पुढे ज्या व्यक्तीने या माजी सैनिकाला मारलं, तो त्याला उठवताना दिसत आहे. माजी सैनिक जखमी झाल्याचंही यामध्ये दिसत आहे, तर त्याची मुलगी बाजूला रडताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> जीव एवढा स्वस्त असतो का? ८ सेकंदाचा व्हायरल VIDEO पाहून अंगावर काटा येईल; नेमकं काय घडलं पाहा ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. यासोबतच या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या तरुणाविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर @SurleYuvraj या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्य प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.