scorecardresearch

VIRAL VIDEO : वर्गातच दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ही लढाई शांत करत असताना मधेच शिक्षक वर्गात पोहोचतात.

boys-Fighting
(Photo: Twitter/ gharkekalesh)

सध्या तरुणांमध्ये रिलेशनशिपची प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये मुलांपासून मुलींपर्यंत आपापल्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसतात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुले एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भांडण करणारे दोन्ही तरुण अॅलन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असल्याचं कळतंय. त्यांनी संस्थेचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये वर्गाच्या आत हे दोन्ही विद्यार्थी एकमेकांशी अतिशय वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. या दरम्यान वर्गातील बाकीचे विद्यार्थी भांडणाचा आनंद घेताना दिसतात. ही लढाई शांत करत असताना मधेच शिक्षक वर्गात पोहोचतात.

@gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हे शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, अॅलन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांमध्ये मुलीवरून भांडण झाले आहे, असं सांगण्यात येतंय. त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ट्विटरवर याला १ लाख ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : चालत्या ट्रेनमधून धारदार शस्त्रे फिरवत होते, धोकादायक स्टंटचा VIRAL VIDEO पाहून पोलिसांनी केली कारवाई

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ही कार आहे की कोळी? हा VIRAL VIDEO शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, “मिलिटरीच्या उपयोगाची गाडी!”

त्याचबरोबर यूजर्स व्हिडीओवर सतत मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की, अशी लढाई करण्यासाठी अॅलन इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची काय गरज होती, तुम्ही तुमच्या शहरातही अशी लढाई करू शकता. तर या स्पर्धात्मक जगात अॅलन इन्स्टिट्यूट आपल्या प्रॅक्टिकलमधून कसे लढावे हे शिकवते, असं देखील आणखी एका दुसर्‍याने कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-10-2022 at 16:07 IST