लहान मुलांना खेळताना आपण नेहमी पाहतो, पण तुम्ही कधी कासवांना खेळताना पाहिलं आहे का? दोन गोंडस कासवांना पकडापकडी खेळताना पाहून किती मजा येईल ना? त्यातही खोल पाण्यात पाहणं, हा तर एक वेगळाच आनंद ठरू शकतो. दोन कासवांना पाण्यात पकडापकडीचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूश व्हाल. हे कासव खेळायचं थांबूच नये, असं तुम्हाला वाटेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन कासव खोल पाण्यात एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत आहेत. खोलवर पाणी उथळ असून सुद्धा यावर हे दोन्ही कासव अफाट वेगाने पोहताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे चक्रावतील. कारण एवढ्या खोल पाण्यात हे दोन्ही कासव जराही न अडखळता, पडता पकडापकडीचा खेळ खेळताना दिसून येत आहेत. आतापर्यंत तुम्ही कासव आणि ससा यांची शर्यत पाहिली. पण दोन कासवांमधल्या या शर्यतीचा खेळ पाहून सारेच जण या व्हिडीओचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा : एकट्या जिराफाची शिकार करायला आले तब्बल ६ सिंह, लढाईत कोण जिंकलं, पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये एक कासव समोरून दुसऱ्या कासवाच्या तोंडाला स्पर्श करून त्याची खोड काढण्याचा प्रयत्न करतो. तस तसं हा दुसरा कासव त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे येताना धावताना दिसून येतो. पण त्याहीपेक्षा जास्त वेगाने पहिला कासव पोहताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही पहिला कासव दुसऱ्या कासवाच्या हाती लागत नाही. या व्हिडीओमधला पहिला कासव इतका खोडसळ असतो की शेवटपर्यंत दुसऱ्या कासवाला चिडवणं सुरूच ठेवतो. दोन्ही गोंडस कासवांमधला हा खेळ पाहून कुणाच्याही चेहऱ्यावर आपोआप स्माईल आल्याशिवाय राहत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही खरी माणूसकी! हा VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : गॅसवर चपाती भाजायची शिकत होती ही मुलगी, पण पुढे तिने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की तो शेअर केल्या केल्याच सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ १ मे रोजी शेअर करण्यात आलाय. अवघे २४ तास देखील उलटले नाहीत तोपर्यंत या व्हिडीओला तब्बल ६३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ रीट्वीट करण्याचा मोह आवरता आला नाही. तर ३८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.