आजचे दुचाकीस्वार ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करतात. त्यामुळे हे लोक मोठ्या वाहनांना वेगाने ओव्हरटेक करत अरुंद रस्त्यावरून निघून जातात. असे करणे कधीकधी धोक्याचे असते. डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे होतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत मोठमोठी वाहने आणि दुचाकी असलेल्या ‘जड चालकांना’ आपली वाहने सांभाळावी लागतात.येथे एखाद्याला ओव्हरटेक करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असते, मात्र काही वेळा काही लोक जाणीवपूर्वक ही चूक करतात. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून कोणाच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय आहे झालं?

व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाणाऱ्या मालाने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक दुचाकीस्वाराला असे काही घडते, ज्यामुळे त्याचा तोल बिघडतो आणि दुचाकीसह तो खड्ड्याच्या दिशेने घसरतो. या घटनेत तो थोडक्यात बचावला, कारण त्याची बाईक आणखी थोडी घसरली तर तो खोल दरीत कोसळला असता, त्यानंतर त्याचा जीव वाचवणे अशक्य होते.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन दुचाकीस्वार एका निसरड्या टेकडीवरून मोटारसायकलवरून सामान घेऊन जाताना दिसत आहेत. दोन ट्रक त्यांच्या समोरून जाताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाऊस आणि बर्फामुळे रस्ता चिखल झाला आहे, तरीही एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याची दुचाकी घसरायला लागते आणि अशा परिस्थितीत त्याचे नशीब त्याला साथ देते आणि अपघाताचा बळी होण्यापासून वाचतो.

( हे ही वाचा: अबब! माशाने गिळला १ मीटर लांबीचा साप; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

नेटीझन्सच्या प्रतक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल हॉग नावाच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओला ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना ‘फायनल डेस्टिनेशन’ चित्रपटाची आठवण झाली, तर अनेक युजर्सनी कमेंट करून अशा वाटांवर चालताना खबरदारी घ्यायला हवी असे सांगितले. कारण एक छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two wheeler slips while overtaking truck on hilly road two wheeler survives falling into deep valley ttg
First published on: 17-11-2021 at 14:06 IST