Escalator Accident Video: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. यात अनेकदा थरारक अपघांताचे व्हिडीओ असतात, तर कधी अक्षरश: चटकन डोळ्यात पाणी आणणारे व्हिडीओ असतात. येथे आपल्याला कॉमेडी, इन्फोर्मेटिव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. तर काही लोक जीवाचा खेळ करताना दिसतात. पण, काही वेळा लोकांचे बनावट स्टंट इतके धोकादायक बनतात की त्यांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे त्यांना असा धडा मिळतो की ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं घडलं काय… सध्या सर्वत्र एस्केलेटर म्हणजेच सरकते जिने आपल्याला पाहायला मिळतात. मॉल, विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक अशा अनेक ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी एस्केलेटर लावलेले पाहायला मिळतात. प्रवाशांच्या सोयीसाठी हे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये. पण, हे जितकं सोयीचं आहे तितकंच धोक्याचंही आहे. काही वेळा निष्काळजीपणे एस्केलेटरवर चढणे धोकादायक ठरते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेल्वेस्थानकावर दोन महिला स्वतःसह एका लहान मुलाचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे. (हे ही वाचा : VIDEO: पाणघोड्याच्या शिकारीसाठी सात सिहिणींचा घेराव; पाणघोड्यानं दिली जोरदार टक्कर, शेवटी कोण पडलं कुणावर भारी?) हे प्रकरण एका रेल्वेस्थानकाचे आहे, जिथे दोन महिला एका मुलासह एस्केलेटरवर जाण्यासाठी मुलाला पकडून खेळ खेळताना दिसत आहेत. दोन्ही महिलांनी त्या लहान मुलाचे दोन्ही हात पकडले व त्याला झुलवून पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला पायरीवर ठेवून अचानक त्या पायऱ्यावर बसल्या अन् तिघांचाही तोल गेला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्या पडल्या. त्यांचा जीव धोक्यात आल्याचे पाहताच आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावू लागले. घटनेनंतर मूल रडायला लागते. मात्र, एक वृद्ध व्यक्ती मदतीला धावते आणि पडलेल्या महिलांना उचलू लागते. येथे पाहा व्हिडीओ १७ सेकंदाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ २ ऑगस्ट रोजी X वर @divyakumaari पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत या पोस्टला ७२.९ हजार व्ह्यूज आणि सुमारे तीनशे लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, "सावधगिरी बाळगली पाहिजे." तर दुसऱ्याने लिहिले, "फक्त गंमत करणे खूप महागात पडले असते.", अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.