Viral Video : असं म्हणतात परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवते. असे अनेक लोक आहेत जे परिस्थितीमुळे संघर्ष करत आहे. परिस्थितीमुळे कमी वयात मुलांवर खूप लवकर अंगावर जबाबदारी येणे, हे आपण अनेकदा ऐकतो. पण मुलांमध्ये संघर्ष करण्याची ताकद व जिद्द असते. हे मुले कष्टाळू असतात आणि प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीचा सामना करत मोठी होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुले चहाचा गाडा चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक छोटा स्टॉट दिसेल. या स्टॉलवर विटांची चूल पेटवली आहे. दोन मुले चहा बनवताना दिसत आहे. या स्टॉलजवळ त्यांनी पाटी लावली. त्या पाटीवर लिहिलेय, “दहा रुपये चहा” त्यांच्या या चहाच्या टपरीवर काही तरुणी चहा प्यायला आलेल्या दिसताहेत. एवढ्या कमी वयात हे मुले चहाचा व्यवसाय करत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईल.
या व्हिडीओवर लिहिलेय, “धंदा करण्यासाठी खूप मोठं भांडवल, खूप मोठी जागा, खूप मोठा अनुभव, शिक्षण लागत नाही. तर धंदा करणाऱ्या पोरांमध्ये खूप मोठा जिगर लागतो.”
moment_masters या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज इव्हेंट ला जात असताना फॉरेस्ट लोहगाव मध्ये ही दोन कष्टाळू मुलं दिसली…वय लहान अनुभवही नाही तरीही जिद्द, परिस्थितीची जाण आणि कष्ट करण्याची इच्छा त्यांच्यात दिसली… एक दिवस ही मूल फार मोठा व्यवसाय नक्की करतील…त्यांच्या चहाच्या स्टॉलला नक्की भेट द्या.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात पुढं मोठ यश वाट बघतय….” तर एका युजरने लिहिलेय, “आज सुरुवात शुन्यातून आहे पण एक दिवस यशस्वी उद्योजक बनणार भावा तू” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ येत्या काळात खूप मोठा माणूस होशील” एक युजर लिहितो, “एक दिवस तू यशस्वी उद्योजक बनणार भावा तू” तर एक युजर लिहितो, “कडक भावा, लहान वय मोठा संघर्ष” आणखी एक युजर लिहितो, “ज्याला परिस्थितीची जाणीव आहे तोच यशस्वी होतो.” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून या मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.