Viral video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. लग्न समारंभ म्हणजे आता एक मोठा इव्हेंट बनला आहे. लग्नात आता नवरा नवरी प्रचंड वेगवेगळ्या हौशी करतात. लग्न ही आयुष्यात अविस्मरणीय गोष्ट आहे. त्यामुळे हा लग्नसोहळा चांगला व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातच सध्या डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना अस्तित्वात आली आहे. या डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना केवळ तरुणाईलाच नाही तर त्यांच्या पालकांनाही आवडू लागली आहे. मात्र यूएईमधील प्रसिद्ध भारतीय व्यावसायिकानं आपल्या मुलीच्या लग्नासाठी असं ठिकाण निवडलं आहे की त्याची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. चला पाहुयात अशा कोणत्या ठिकाणी हे लग्न झालं आहे.

या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून युएईमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती दिलीप पोपले यांच्या मुलीचा विवाह सोहळा चक्क एका विमानात आणि तेही ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

Bloodshed because of professional competition in Gondia Sand businessman killed in firing
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Anthony Albanese
सिडनीतील हल्लेखोराची ओळख पटवण्यात यश
dombivli, nandivali, illegal shops, illegal shop construction on road
डोंबिवलीतील नांदिवलीत वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा गाळ्याचे बांधकाम; शाळा, व्यापारी संकुलांच्या वाहनांना अडथळा

यावेळी नवरा-नवरीसह सर्वांनी दुबई ते ओमान असा तीन तासांचा प्रवास या लग्नाच्या निमित्ताने केला. freepressjournal च्या वृत्तानुसार दिलीप पोपले हे सध्या दुबईत वास्तव्यास आहेत. आपल्या मुलीचं लग्न हटके करायचं असं त्यांचं स्वप्न होतं. विशेष म्हणजे १९९४ मध्ये पोपले यांचंही लग्न एअर इंडियाच्या फ्लाइटमध्येच पार पडलं होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हा ड्रायव्हर युटर्न घेणार तरी कसा? एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; VIDEO चा शेवट पाहून व्हाल अवाक्

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विमानात सर्व वऱ्हाडी गाण्यांवर नाचत आहेत, मजा करत आहेत. विमानातही आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. व्हिडीओच्या शेवटी नवरा नवरी म्हणजेच दिलीप यांची मुलगी आणि जावई सर्व कुटुंबाचे आभार मानतात.