Neet viral video: देशभरात पेपरफुटीनंतर होत असलेल्या नीट यूजी 2026 च्या (NEET) परीक्षेसाठी आज देशभरात एनटीएनने मोठी तयारी केल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागलो होता. लातूर पॅटर्नमुळे देशभरात गाजलेल्या लातूर जिल्हा प्रशासनानेही नीट परीक्षेची सर्व तयारी केली होती. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, एनटीएकडून देण्यात आलेल्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. एनटीएच्या याच नियमांचा फटका मध्यप्रदेशातील एका विद्यार्थीनीला बसला असून केवळ दोन मिनिटे उशीर झाल्याने एका विद्यार्थीनीला परीक्,ा देता आली नाही. यावेळी हतबल झालेल्या वडिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल..
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वाढती महागाई, तंत्रज्ञानातील वेगळे बदल आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धांमुळे ही चिंता अधिक वाढते. अशीच भीती आणि चिंता या तरुणीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी अवघे दोन मिनिटं परिक्षेला उशीरा पोहचली आणि परीक्षा केंद्राचं गेट बंद करण्यात आलं. यावेळी तिनं प्रचंड गयावया विनंती करुनही तिला आतमध्ये सोडलं गेलं नाही. वडिलांनीही पोलिसांच्या अक्षरश: पाया पडले तरीही मुलीला आत सोडलं नाही यावेळी वडिलांनी गेटवर आपलं डोकं आपटून घेतल्याचं दिसत आहे. ते अक्षरश: रडत आहेत, हात जोडून विनंती करत आहे मात्र तरीही विद्यार्थिनीला आतमध्ये सोडलं नाही.
परीक्षार्थी उमेदवारांची घालमेल पाहून इतर विद्यार्थांच्या पालकांनी देखील संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता घ्यावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली. मात्र, NTA अधिकाऱ्यांनी नियमांच्या पुढे जात येत नाही, असे म्हणत विद्यार्थ्यांना प्रवेशास मनाई केली. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
पाहा व्हिडीओ
देशभरातील २२.७९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट-यूजी २०२६ ची पुनर्परीक्षा दिली. यासाठी देशभरातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ५,४४० केंद्रे उभारण्यात आली होती. ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५:१५ या वेळेत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी १:३० पर्यंत परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला
