Ukhana Viral Video : उखाणा हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी महिला आवडीने उखाणा घेतात. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा उत्साहाने उखाणा घेताना दिसतात. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. सध्या महाराष्ट्रात उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशाच एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला उखाणा घेताना दिसते. तिचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला उखाणा घेते, “रत्नदिपच्या गणपतीला सुंदरसा आकार, अभिनंदनचं नाव घेते,बाईsss.. हा काय प्रकार!! या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्व महिला हा काय प्रकार तिच्याबरोबर म्हणताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Himachal Pradesh Ragging Video: दारू प्यायला नाही, म्हणून ज्युनिअर विद्यार्थ्याला सीनिअर्सकडून मारहाण; रात्रभर करत होते रॅगिंग!

anchor_monika_jaju या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाई हा काय प्रकार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “निकी फिवर” तर एका युजरने लिहिलेय, “मस्त” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : CCTV installs on Daughters Head: मुलीच्या सुरक्षेसाठी बापाची अनोखी शक्कल; डोक्यावर बसवला सीसीटीव्ही कॅमेरा, मुलगी म्हणते…

बाईsss.. काय प्रकार?

सध्या मराठी बिगबॉस चांगलेच चर्चेत आहे. घरातील टास्कपासून तर स्पर्धकापर्यंत सोशल मीडियावर सर्वांची चांगलीच चर्चा होत आहे. बिगबॉसच्या घरातील निक्की तांबोळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येते. अशात एकदा घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम्स व गाणी तयार करण्यात आले. घरातील सदस्य सुद्धा तिला या शब्दावरून चिडवत असतात. बाईSSS हा काय प्रकार हा निक्कीचा आता फक्त डायलॉग राहिला नाही तर डायलॉगने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. . लोक यावर मीम्स, रील्स, व्हिडीओ बनवत आहे. एवढंच काय तर तिच्या डायलॉगवरून लोकांनी गाणं सुद्धा बनवलं आहे.

काही दिवसांपूर्वी निक्कीच्या या डायलॉगवर काही चिमुकल्यांनी भन्नाट डान्स केला होता. त्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.