Ukhana video: उखाण्याला आपल्याकडे खूप महत्त्व असते. लग्नाकार्यात किंवा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आवर्जून उखाणे घ्यायला लावले जातात. एकमेकांचे नाव घेणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. बरेच जण जुने झालेले तेच तेच उखाणे घेतात पण ज्यांच्याकडे कलात्मकता असते ते नव्याने उखाणे रचतात आणि त्यात आपल्या जोडीदाराचे नाव घालतात. प्रसंगानुरुप उखाणे तयार करण्याचे काही जणांकडे खास स्कील असते. पूर्वीच्या काळी मोठेच्या मोठे उखाणे घेण्याची पद्धत होती. आता मात्र आताच्या काळाशी निगडीत असे हटके उखाणे घेण्याला तरुणांकडून पसंती दिली जाते. सोशल मीडियावरही सेलिब्रिटींनी घेतलेले उखाणे बरेच व्हायरल होतात नुकताच एका मराठमोळ्या आजींनी घेतलेला उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय गावरान भाषेत पण तितक्याच ठसक्यात त्यांनी घेतलेला उखाणा ऐकून आपल्यालाही हसू आल्याशिवाय राहत नाही.

उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्न समारंभात लयबद्ध पद्धतीने आवडीने जोडीदाराचे नाव घेतले जाते यालाच आपण उखाणा म्हणतो. पूर्वी महिला त्यांच्या पतीसाठी उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात.सोशल मीडियावर पुरुष किंवा महिलांचे उखाणे घेतानाचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा महिला विनोदी उखाणा घेताना दिसत आहेत. या या आजीबाईंचाही सैराट स्टाईलमधला एक उखाणा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Chennai mans scooter-raft ride with grandchildren in flooded complex Viral video
“हे फक्त आजोबाच करू शकतात!” चक्क पुराच्या पाण्यात नातवंडाना बोटीत बसवून फिरवले, Viral Videoपाहून पोट धरून हसाल
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Funny video of a bride stopping the saptapadi ritual to apply nail polish is currently going viral on social Media
नवरी जोमात नवरदेव कोमात! नेल पॉलिशमुळे चक्क सप्तपदीच थांबली; व्हायरल VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Groom's Hilarious funny Ukhana
“…आई आई नाही; बायको बायको करायचं” नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल
The cow hit the woman
‘गाईने थेट धडक मारून महिलेला उडवलं…’ पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असलेल्या या आजींचे वयही ७० ते ८० च्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. गुलाबी रंगाची सुती साडी, कपाळावर लाल मोठं कुंकू लावलेल्या या आजीबाई दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल असा काय घेतला आजीबाईंनी उखाणा? तर या आजीबाईंनी “मळ्याच्या मळ्यात होतं निंबोनीचं झाड त्याला आली मिरची उत्तम पाटील माझे परशूराम आणि मी त्यांची आर्ची”  मिश्किल विनोदी असा उखाणा या आज्जींनी घेऊन सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “होणार सून मी या घरची” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; सासरची मंडळीही पाहतच राहिली

या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा उखाण्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आजींनी अतिशय अनोखा उखाणा घेतला आहे.यावर नेटकरीही वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “एक नंबर आजी” तर आणखी एकानं आजी काही ऐकत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी टाकले आहेत.

Story img Loader