Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शुभ कार्याच्या वेळी किंवा लग्नाच्या वेळी अनोख्या काव्यमय पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी बायको नवऱ्यासाठी उखाणा घ्यायची पण आता नवरासुद्धा तितक्याच उत्साहाने बायकोसाठी उखाणा घेताना दिसतो.
सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीसाठी भन्नाट उखाणा घेतला आहे.




हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नात सर्वजण नवरदेवाला उखाणा घेण्याचा आग्रह करतात तेव्हा तो नवरीसाठी मजेशीर उखाणा घेतो.
तो उखाणा घेताना म्हणतो, “रस्ता अडवायला जमल्या साऱ्या बहिणी, सुकन्याचं नाव घेतो.. आवडली का तुमची वहिनी” नवरदेवाचा हा उखाणा ऐकून नवरीसह आजुबाजूला असलेल्या लोकांना हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नवरदेवाने थेट उखाण्याद्वारे विचारले की नवरी आवडली का? हा हटके उखाणा युजर्सना सुद्धा खूप आवडला आहे.
हेही वाचा : नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
marathi.weddings या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी हसण्याचे सुद्धा इमोजी शेअर केले आहेत.