Viral Video : उखाणा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी विवाहीत जोडपे काव्यमय पद्धतीने जोडीदाराचं नाव घेतात. सुरुवातीला ही उखाण्याची परंपरा स्त्रियापर्यंतच मर्यादीत होती पण आता पुरुषही तितक्याच हौशीने नाव घेताना दिसून येतात.
सोशल मीडियावर लग्नातील नवरी नवरदेवाच्या उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाणे ऐकून पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक जुना उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ लग्नातील आहे. हळदीच्या कार्यक्रमाच्या वेळी नवरा नवरी खाली बसलेले असतात. नवरीसह तिथे असलेल्या सर्व महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसलेल्या असतात. या महिला नवरदेवाला नवरीचं नाव घेण्याचा आग्रह करतात तेव्हा नवरदेव उखाणा घेतो.
नवरदेवाचा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
नवरदेव म्हणतो, “नाव घ्या नाव घ्या.. हा काय कायदा, नाव घ्या नाव घ्या.. हा काय कायदा; कल्पनाचं नाव घेतो, तुमचा काय फायदा..”
हा उखाणा ऐकून बाजूला बसलेली नवरी आणि सर्व महिला जोरजोरात हसायला लागतात.




storiesby_9 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “एक नंबर मित्रा” तर एका युजरने लिहिलेय, “विचारणाऱ्या लोकांचा काहीच फायदा नसतो, हे खरंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह.. काय उत्तर दिलं भावा”