महागाई किती वाढलीये.. दागदागिने, कपडालत्ता सोडा भाजी घेताना पण आधी पर्स रिकामी करावी लागतेय.. अगदी ट्रेनच्या डब्ब्यापासून ते मंडईपर्यंत सगळीकडे तुम्ही हे एक संभाषण नक्की ऐकलं असेल. आणि खरोखरच साधारण प्रत्येक भाजीची किंमत ४०-५० रुपये पाव किलो- अर्धा किलो इथवर पोहचलीच आहे. पण आता जर आम्ही तुम्हाला एक खास दुकान सांगितलं की जिथे तुम्हाला हवी तशी साडी अवघ्या २५ रुपयात विकत घेता येईल तर.. विश्वासही बसणार पण हे खरंय! उल्हासनगर मधील एका दुकानदाराने हा खास सेल सुरु केला असून सध्या या दुकानात साडी खरेदीसाठी महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळतेय. १५ ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरु राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Balenciaga ने लाँच केली 1.4 लाखाची कचऱ्याची पिशवी; फीचर्स ऐकून नेटकरी म्हणतात..

उल्हासनगरच्या गजानन मार्केट मधील रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानात हा अनोखा सेल आयोजित करण्यात आला आहे.आता इतक्या स्वस्तात साडी म्हणजे काहीतरी गडबड असणार असा विचार तुमच्या डोक्यात आला असेल पण अशा प्रकारे स्वस्तात साडी विकण्याची ही या दुकानाची पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अवघ्या १० रुपयात साडी विक्रीचा सेल आयोजित करून रंग क्रिएशन चर्चेत आले होते. त्यावेळी महाराष्ट्रभरातून महिलांनी या दुकानासमोर गर्दी केली होती. प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना हस्तक्षेप करून हा सेल थांबवावा लागला होता.

Heineken Beer Sneakers: शूज मध्ये बिअर, ‘हे’ नवे डिझाईन पाहिले का?

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व गोरगरिबांचा फायदा व्हावा या भावनेतून हा सेल आयोजित केल्याची माहिती दत्ताभाऊ मोरे व अश्विन साखरे यांनी दिली. यासाठी ग्राहकांना आधार कार्ड दाखवून साडी विकत घेता येईल. तसेच प्रत्येक ग्राहकाला केवळ एकच साडी २५ रुपयात विकत घेता येईल. काय मग वाट कसली पाहताय? आधार कार्ड घ्या आणि आवडेल ती साडी घरी घेऊन या ती सुद्धा केवळ २५ रुपयात! आणि हो.. केवळ महिलाच नाही तर पुरुष सुद्धा इथे खरेदीसाठी जाऊ शकतात. तुमच्या प्रिय आईला, बायकोला, किंवा रक्षाबंधनासाठी बहिणीला तुम्ही इथून साडी भेट देऊन खुश करू शकाल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar saree sale buy any saree at 25 rs only check details svs
First published on: 06-08-2022 at 15:39 IST