Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. मात्र, यावेळी या स्टंट करणाऱ्या तरुणांना चांगलाच चोप बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या दोन तरुणांवर संताप व्यक्त कराल.

रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. स्टंटबाजी करणारे हे तरुण अशावेळी स्वत: बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अनेकवेळा हे तरुण तावडीतून सुटतात, तर काहीवेळा पोलिसांच्या तावडीत सापडले तर चांगला मार खातात. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना रस्त्यावरील लोकांनी पकडलं आहे. यावेळी तिथे ट्रॅफिक पोलिसही दिसत आहेत. दरम्यान, एक व्यक्ती या दोन्ही तरुणांना हेल्मेटने मारहाण करताना दिसत आहे, तर पोलिसही तरुणाच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत.

If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral
झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल
Man Dies Due To Electric Shock While Washing Clothes In Washing Machine video
VIDEO: घरात वॉशिंग मशीनचा वापर करत असाल तर सावधान! कपडे धुताना व्यक्तीचा ३ सेंकदात अंत, नेमकं काय घडलं?
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…

धावत्या दुचाकीवर जीवघेणा स्टंट करणे आणि रस्त्यावरील इतर पादचारी आणि प्रवाशांच्या जीवाला संभाव्यपणे धोका निर्माण केल्याबद्दल नागरिकांनी तरुणांना चांगलीच अद्दल घडवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एका सेंकदाची किंमत ‘या’ जीप ड्रायव्हरला विचारा; डोंगरावरुन पडला महाकाय दगड अन् अवघ्या ३ सेंकदात होत्याचं नव्हतं

सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळीदेखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, तरुणाईवर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, क्षणभर असे वाटेल की, आता संपलं सगळं. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप धोकादायक आहे हे, बरोबर केलं,’ त्याच वेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही.’