Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. सोशल मीडियावर कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो.काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गमतीजमतीचा किंवा एखाद्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक काका काकुंचा सुंदर फोटो काढताना दिसत आहे. काका इतक्या उत्साहाने फोटो काढत आहे की पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला धनु्ष्य बाणाचा आयकॉन दिसेल आणि काकू त्या आयकॉनसमोर उभ्या आहेत. बाण मारतानाची एक पोझ देत आहे. काका काकुचा या पोझमध्ये फोटो काढताना दिसत आहे. फोटो नीट यावा म्हणून काका खाली बसून फोटो काढताहेत. फोटो काढण्यासाठी काकांची ही मेहनत पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, "जे निवडलंय ते आवडावं लागतं" व्हिडीओवर या ठिकाणचे नाव सुद्धा सांगितले, "आम्रबन रेसॉर्ट चिपळूण" हा व्हिडीओ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील एका रेसॉर्टमधील आहे. हेही वाचा : Viral Video: अबब! वरमाला घालताच वराने लगावली वधूच्या कानशिलात, त्यानंतर घडलं ‘असं’ काही की, VIDEO पाहून व्हाल थक्क नवरा बायकोचे प्रेम हे जगावेगळे असते आणि त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. आजच्या मोबाइलच्या जगात तरुणाईपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना मोबाइलचे वेड लागले आहे. जो तो मोबाइलवर सेल्फी किंवा फोटो काढताना दिसतो, व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतो, रील बघताना दिसतो. या व्हिडीओमध्ये सुद्धा काका फोटो काढताना दिसत आहे आणि काकू सुंदर पोझ देताना दिसत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : रेल्वे फाटक ओलांडताना अडकली SUV कार अन् तेवढ्यात पाठीमागून भरधाव आली ट्रेन अन् १६ सेकंदांत घडलं काय; पाहा व्हिडीओ _pratik_burte या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "आज पर्यंत पाहिलेला सर्वात भारी व्हिडिओ" तर एका युजरने लिहिलेय, "प्रेम जे शेवट पर्यंत साथ सोडत नाही " आणखी एका युजरने लिहिलेय, "निस्वार्थी प्रेम…" हा व्हिडीओ अनेक युजर्सना आवडला असून अनेकांनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. या पूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक काका त्यांच्या पत्नीचे आवडीने फोटो काढताना दिसले होते. त्यावेळी सुद्धा नेटकऱ्यांना तो व्हिडीओ खूप आवडला होता.