Funny Video Viral : रस्त्यावरून चालताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही ठरवून दिलेले नियम असतात, जे पाळणं प्रत्येकासाठी बंधनकारक असतं. अशाच प्रकारचे नियम अनेक इमारती, बंगल्याबाहेरील गेटवरही वाचायला मिळतात, जे फॉलो करूनच लोक तिथे प्रवेश करतात. दरम्यान, अशाच एका नियमाचे पालन करणाऱ्या काकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल; कारण यात काका नियम पाळण्याच्या नादात असं काही करतात की पाहून कुणालाही हसू येईल.

कल्पना करा, तुम्ही कुठल्यातरी इमारतीत प्रवेश करताय, यावेळी तुमच्यासमोर इमारतीचा मोठा दरवाजा उघडा आहे, ज्यातून तुम्ही सहज इमारतीत प्रवेश करू शकता, पण व्हिडीओतील काका तसं काही करत नाहीत. पण, जे काही करतात ते पाहून कोणालाही हसू येईल. व्हिडीओत काका कुठेतरी चालत जात असल्याचे दिसतेय. यावेळी त्यांच्यासमोर एक मोठे लोखंडी गेट आहे जे पूर्ण उघडे आहे, पण ते त्यातून न जाता उघडलेल्या गेटच्या आतील लहान गेट आहे त्यातून जातात. अनेक जुन्या इमारतींमध्ये अशाप्रकारचे गेट पाहायला मिळतात, ज्यातील छोट्या गेटचा वापर आत-बाहेर येण्यासाठी केला जातो, त्यामुळे ते काकाही इमानदारीने त्याच गेटमधून जाण्याचा नियम पूर्णपणे पाळतात.

काकांचं हे वागणं पाहून अनेकजण त्यांना ट्रोल करताना दिसतायत. दरम्यान, काकांचा हा व्हिडीओ @badger69420 नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी माझ्या कंपनीतील बिनकामाच्या नियमांचे पालन करतोय.” अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “नियम म्हणजे नियम” दुसऱ्याने लिहिले की, “तुम्हाला याच गेटमधून जावे लागेल” तिसऱ्याने लिहिले की, “त्यांना त्या छोट्या गेटचा उद्देश पूर्ण करायचा होता.”