Uncle Pushpa Style Dance Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकजण आपली डान्स कला सादर करण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्या कलेला युजर्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या अशाच एका काकांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात काकांच्या एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स पाहून युजर्सही चक्रावून गेले.

डान्स ही अशी कला आहे, जी केव्हा कधीही आणि कुठेही सादर करताना दिसतात. डान्स वेडे लोक नाचताना वय, ठिकाण याचा विचार करत नाही, संधी मिळेल तिथे मनसोक्त नाचून घेतात, आपली नाचण्याची हौस भागवतात. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचं ‘सुंदरी सुंदरी’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स डान्स रील्स बनवताना दिसत आहेत. व्हिडीओतील काकांनीही याच गाण्यावर भन्नाट डान्स केलाय, त्यांच्या या जबरदस्त डान्सने आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे काका सुंदरी गाण्यावर नाचताना अचानक मधेच पुष्पा सिनेमातील डान्स स्टेप करताना दिसतायत.

सुंदरी सुंदरीवर काकांचा भन्नाट डान्स

व्हिडीओत पाहू शकता की, एका चिमुकलीचा नामकरणाचा सोहळा आहे. याच सोहळ्यात काका अगदी बिनधास्तपणे नाचतायत. लोकप्रिय गायक संजू राठोडच्या ‘सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे’ गाण्यावर ते अगदी उत्साहात नाचतायत. यावेळी ते असे काही एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स करतायत की पाहणारेही पाहतच राहिले. नाचता नाचता काकांना मधेच पुष्पा सिनेमातील गाण्यावरील स्टेप्स आठवल्या, त्यांनी त्याही केल्या. ते फक्त नाचतच नाही तर नाचताना चेहऱ्यावर अगदी जबरदस्त एक्स्प्रेशनही देतायत, त्यामुळे त्यांचा डान्स पाहून उपस्थितही चक्रावले.

व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, काका काही प्रोफेश्नल डान्सर नाहीत, पण ते आवड म्हणून नाचतायत, त्यामुळे उपस्थित लोकही टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहे. या व्हिडीओला आता सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.

काकांचा हा भन्नाट डान्स व्हिडीओ @michael.dr.giri नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही एकापेक्षा एक भारी कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, सुंदरीला अटॅक आणला काका, तुम्हाला नाव गाव सांगणार नाही बोलते; दुसऱ्या एका युजरने गमतीत लिहिले की, काकांनी ८ दिवस घरी पुष्पाच्या डान्सवर प्रॅक्टिस केली होती, पण अचानक कॅसेट हरवल्यामुळे सुंदरी या गाण्यावर डान्स करावा लागला असेल.