Union Budget 2023 & RRR Connection: RPG समूहाचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन गोयंका हे त्यांच्या सोशल मीडियावरील मजेशीर पोस्टसाठी सुद्धा बरेच प्रसिद्ध आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गोयंका यांनी आपल्या खास मजेशीर शैलीत ट्वीट केले आहे. अर्थसंकल्प २०२३ वर प्रतिक्रिया देताना गोयंका यांनी बजेटचे RRR कनेक्शन बांधले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात एक साम्य असल्याचे गोएंका म्हणत आहेत. हे कनेक्शन नेमकं काय आहे चला तर जाणून घेऊयात.

हर्ष गोएंका यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ हे ‘नाटू नाटू’ बजेट असल्याचे म्हंटले आहे. गोएंका म्हणतात की, ” आरपीजीमध्ये आम्हाला हे बजेट का आवडले? कारण हे बजेट सुद्धा आरआरआर सारखे, रेल्वे, रिन्यूएबल्स (नूतनीकरण), रिफॉर्म (सुधारणा) या तीन मुद्द्यांवर आधारित हे एक नाटू नाटू बजेट आहे. आता आपण बजेटने सुद्धा गोल्डन ग्लोब जिंकण्याच्या मार्गावर आहोत.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

बजेट २०२३ चे RRR कनेक्शन

RRR ची हवा का होतेय?

एसएस राजामौली यांच्या आरआरआरने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपटाला अलीकडेच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये मोठा मान मिळाला होता. नाटू नाटू गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीतील ९५व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सुद्धा आरआरआरला नामांकन मिळाले आहे. RRR ने केवळ गोल्डन ग्लोब्ससह क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स २०२२ मध्येही सन्मान मिळवला आहे.

हे ही वाचामी<< निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या

दरम्यान, आजच्या बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मोदी सरकारच्या बजेटमध्ये करदात्यांना यंदा विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाने आपणही समाधानी आहात का? आपले मत कमेंट करून नक्की कळवा.