scorecardresearch

Premium

मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral

शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी इंफाळमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पारंपारिक नृत्य केलं.

Smriti Irani dance
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा मणिपूरमध्ये कलाकारांसोबत केलं नृत्य (फोटो: @ANI / Twitter)

मणिपूरसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आता २८ फेब्रुवारीला होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आता ५ मार्चला मतदान होणार आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपच्या प्रचारासाठी राज्याची राजधानी इंफाळमध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांनी महिला कलाकारांसोबत पारंपारिक नृत्यात सहभाग घेतला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

याआधी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आता २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याआधी २७ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार होते. याशिवाय मणिपूरमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख बदलून ३ मार्च ते ५ मार्च करण्यात आली.

uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
Nitin Gadkari in Washim 3
“…तर ठेकेदाराला बुलडोझरखाली फेकेन”; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
National mali Federation Presiden
निजाम राजवटीतील नोंदीच्या आधारे जातीचे दाखले दिल्याने नवा वाद उफाळेल, राष्ट्रीय माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचे मत

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली पडला)

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचे निकाल १० मार्च रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या निकालांसह घोषित केले जातील. मणिपूरमध्ये ४ मार्च आणि ८ मार्च रोजी शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. मणिपूर निवडणुकीसाठी भाजपने आदल्या दिवशी आपला जाहीरनामा इंफाळमध्ये प्रसिद्ध केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister smriti irani holds contract with manipur artists video viral on social media ttg

First published on: 19-02-2022 at 16:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×