राजकारणात सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष अशा कुरघोड्या काही नवीन नाहीत. मागील काही काळात देशात व राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यांमुळे अगदी सामान्य माणूस सुद्धा सर्व नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे आणखीनच सोपे झाले आहे. असाच एक व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल झालेला दिसून येत आहे. यात पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. आश्चर्य म्हणजे टीका करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील मोदींच्या भाषणानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

आझादीच्या अमृत महोत्सवात मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना महागाईवर एकही विधान केले नाही म्हणत विरोधकांनी निषेध केला होता. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये राजनाथ सिंह हे सुद्धा याच मुद्द्यावरून बोलताना दिसत आहेत. “पंतप्रधान ६ महिन्यात महागाई कमी करण्याचे आश्वासन मागील ९ वर्षांपासून देत आहेत मात्र अजूनही महागाई कमी झालेली नाही याचा अर्थ असा की पंतप्रधानच देशातील जनतेला खोटे आश्वासन देत आहेत,” अशा शब्दात संरक्षण मंत्र्यांनी टीका केली आहे.

Viral Video electric car with broken side mirror man jugaad and attaching a plastic mirror in its place
गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल
Narendra Modi Rally Extremely Crowded But Original Video Claimed To be From Congress
नरेंद्र मोदींच्या विजयाची झलक काँग्रेसच्या प्रचारयात्रेत दिसली? तुफान गर्दीचा Video पाहताना ‘ही’ बाब लोक विसरलेच
Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
Viral Video Meet the Man Who imitate the sitar the cornet and the violin and the clarinet with his mouth
VIDEO: अवघ्या काही सेकंदात तोंडाने काढला विविध वाद्यांचा आवाज; अनोख्या कलेला प्रवाशांनी दिली दाद

यावरून कोणतेही अंदाज बांधण्याच्या आधी यामागचे तथ्य जाणून घ्या, खरंतर या व्हिडीओ मध्ये राजनाथ सिंह हे स्वतः बोलत असले तरी हा आताचा व्हिडीओ नाही. पीआयबीने स्वतः याविषयी माहिती देत सांगितले की हा व्हिडीओ २०१३ चा असून त्यावेळेस राजनाथ सिंह हे भाजप अध्यक्ष होते व तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करताना एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले होते.

व्हायरल व्हिडीओचे फॅक्ट चेक

हा जुना व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. यातील राजनाथ सिंह यांचे विधान हे पंतप्रधान मोदी किंवा भाजप सरकारवर टीका करणारे नाही अशीही माहिती पीआयबी कडून देण्यात आली आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून हा खोटा व्हिडीओ असला तरी आताही लागू होतो अशा पद्धतीची प्रतिकिया दिलेली आहे.