VIRAL VIDEO : दृष्टिहीन सायकलस्वार डोळसांना देणार रस्ता सुरक्षेचा संदेश; ४५ दिवसांमध्‍ये १२ राज्‍यातून प्रवास करणार

दृष्टिहीन व्यक्तींना आयुष्य जगणे खूप कठीण जाते. त्यात हजारो किमीचा प्रवास म्हटले की आणखीनच अवघड काम. मात्र, एका पंचविशीतल्या दृष्टिहीन युवकाने सायकलने तब्बल १२ राज्‍यांमधून प्रवासाचे शिवधनुष्य उचलून डोळसांनाही लाजवणार आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

unique-cycle-journey-blind-youth-Road-safety-message

वाहतुकीची साधने विकसित व विस्तृत झाली. मात्र त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालक व मालकांची मानसिकता तशीच जुनी-पुराणी राहिली. यासाठी रस्ता सुरक्षिततेबाबत अधिक दक्ष होणं गरजेचं आहे. वाहतुकीचे नियम दंड आकारण्यासाठी नव्हे, तर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आहेत. याची जाणीव नागरिकांना व्हावी, म्हणून दृष्टीहीन सायकलस्वाराने पुढाकार घेतला आहे. यात तो रस्‍ता सुरक्षा आणि आपल्‍या देशाच्‍या रस्‍त्यांवर पुरेशी प्रकाशयोजना असण्‍याच्‍या गरजेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी भारतभरात ७,५०० किमीचा प्रवास सुरू करणार आहे. या दृष्टीहीन सायकलस्वाराने घेतलेल्या पुढाकाराचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येतंय.

वाहतुकीचे नियम, त्यांचे महत्त्व, नियमांचे उल्लंघन केल्यानंतर होणारी दंडात्मक कारवाई सर्वांना माहित व्हावी म्हणून आजवर अनेक उपक्रम राबविले जातात. पण रस्त्यांवरील प्रकाशयोजनेमधील जागतिक अग्रणी सिग्निफाय (पूर्वीची फिलिप्‍स लायटिंग) बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी या दृष्टीहीन सायकलस्वाराने हा निर्णय घेतलाय. यात तो भारतरभर ७,५०० किमीचा प्रवास करणार आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून तो सायकलवरून या प्रवासाला सुरूवात करणार आहे. पुढे श्रीनगर, कन्‍याकुमारी अशा देशाच्‍या कानाकोप-यापर्यंत प्रवास करणार असून पुन्हा मुंबईमध्‍ये परतणार आहे. अवघ्या ४५ दिवसांमध्‍ये तो भारतातील एकूण १२ राज्‍यांमधून प्रवास करणार आहे. रस्त्यावरील प्रकाशयोजनेमधील जागतिक अग्रणी सिग्निफायला (पूर्वीची फिलिप्‍स लायटिंग) ला पाठिंबा देण्यासाठी तो ही अनोखी सफर करणार आहे. ‘फिलिप्‍स लायटिंग’ यांच्या अधिकृत फेसबूक पेजवर याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : एका बेघर मुलाला मिठी मारणाऱ्या चिमुकल्याने लोकांची मनं जिंकली; हा भावुक VIDEO VIRAL


इथे पाहा व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीनं धूम ठोकली आणि थेट वॉटरपार्कमध्ये स्लाइड्सवर खेळू लागली…

या अनोख्या सफरीची साधी कल्पना जरी केली तरी डोळसांच्याही कपाळाला आट्या येतात. पण दृष्टिहीन सायकलस्वाराने इतकं धाडस केल्याचं पाहून सारेच जण या सायकलस्वाराचं कौतुक करत आहेत. अजय लालवानी असं या दृष्टिहीन सायकलस्वाराचं नाव आहे. अजय हा २५ वर्षीय दृष्टिहीन सायकलस्‍वार आहे. त्‍याने यापूर्वी मुंबई-गोवा-मुंबई आणि दादर-गोंदिया-दादर असे अंध सायकलिंगमध्‍ये दोन वर्ल्‍ड रेकॉर्डस् स्‍थापित केले आहेत. त्‍याने ज्‍यूडो व कबड्डीमधील राष्‍ट्रीय स्‍तरीय पॅरा-स्‍पोर्टस् स्‍पर्धांमध्‍ये अनेक पदके देखील जिंकली आहेत.


या प्रवासाबाबत अजय लालवानी म्‍हणाला, ”दरवर्षी आपल्‍या देशामध्‍ये रस्‍ते अपघातांमुळे अनेकांचा मृत्‍यू होतो. या उपक्रमासह मी रस्‍त्‍यांवरील योग्‍य प्रकाशयोजनेच्‍या माध्‍यमातून रस्‍ता सुरक्षिततेच्‍या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्‍याची आशा करतो. मला आनंद होत आहे की, सिग्निफाय मला या ध्येयामध्‍ये पाठिंबा देत आहे. मी या ४५ दिवसांच्‍या शेवटी माझे स्‍वप्‍न पूर्ण होण्‍याची आशा व्‍यक्‍त करतो.”


याप्रसंगी सिग्निफाय इनोव्‍हेशन्‍स साऊथ एशियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व व्‍यवस्‍थापकीय संचालक सुमित पद्माकर जोशी म्‍हणाले, ”सिग्निफायमध्‍ये आम्‍ही अजयच्‍या कटिबद्धतेला सलाम करतो. तो रस्‍ता सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी देशभरात या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात करत आहे. रस्‍त्‍यांवर पुरेशी प्रकाशयोजना रस्‍ता सुर‍क्षा वाढवत अपघातांचे प्रमाण कमी करण्‍यामध्‍ये मोठी भूमिका बजावू शकते. अजयसोबत सहयोगाने आम्‍ही देशाचे या कार्याप्रती लक्ष वेधून घेण्‍याची आणि भविष्‍यात आपल्‍या देशामध्‍ये सुरक्षित रस्‍ते असण्‍याची आशा करतो. तो आम्‍हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. आमच्‍याकडून त्‍याला त्‍याच्‍या या प्रवासासाठी शुभेच्‍छा!”

दृष्टिहीन व्यक्तींना आयुष्य जगणे खूप कठीण जाते. त्यात हजारो किमीचा प्रवास म्हटले की आणखीनच अवघड काम. मात्र, एका पंचविशीतल्या दृष्टिहीन युवकाने सायकलने तब्बल १२ राज्‍यांमधून प्रवासाचे शिवधनुष्य उचलून डोळसांनाही लाजवणार आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unique cycle journey blind youth road safety message to the eyes of blind cyclists will travel through 12 states in 45 days prp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या