Viral Video : अशी शिकवण्याची पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल, बघून पोट धरून हसाल!

वर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्याची ही अनोखी स्टाईल पाहून तुम्ही पोट धरून हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Teachers-Video-Viral
(Photo: Instagram/ bhutni_ke_memes)

भारतातील लोक प्रत्येक गोष्टीत जुगाड किंवा नवीन तंत्र शोधून काढण्यात तरबेज असतात. शेती असो, ड्रायव्हिंग असो, ऑफिस किंवा घराशी संबंधित काम असो, या सगळ्याच्या संबंधित वेळोवेळी अनेक देसी जुगाडाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असे जुगाड खरोखरंच तुमचं काम सोपे करतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक शिक्षकही काही नवीन पद्धती अवलंबतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकर आणि सहज लक्षात राहता येईल. अशाच देसी जुगाडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हिंदी वर्णमालेतील अक्षरमाला शिकवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

अक्षरओळख शिकवण्याचा उत्तम मार्ग
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एखाद्या एखाद्या शाळेतल्या वर्गातला दिसून येतोय. वर्गात शिक्षकांशिवाय अनेक विद्यार्थीही दिसत आहेत. शिक्षकांना या विद्यार्थ्यांना हिंदी वर्णमालेतील अक्षर ओळख करून देत आहेत. विद्यार्थ्यांनी हा फरक कधीही विसरू नये, यासाठी त्यांनी काही वेगळे तंत्र वापरले आहेत. तो वेगवेगळ्या पोझिशन्स घेऊन नाचतो आणि प्रत्येक मात्रा दाखवतो. विद्यार्थी त्या पायऱ्या सहज करून अक्षरमाला लक्षात ठेवण्याचाही प्रयत्न करतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! एक नव्हे दोन सिंहांसमोर छातीठोकपणे उभा राहिला हा माणूस, लोक ओरडत राहिले पण…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’

हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. केवळ वर्गात उपस्थित विद्यार्थीच नाही तर इतर लोकही या देसी जुगाड तंत्राने केलेल्या अभ्यासाचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतो. तो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर खूप मजेदार कमेंट्सही केल्या जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unique teaching techniques by teacher funny video getting viral watch this viral video prp

Next Story
VIRAL VIDEO : बाबो! एक नव्हे दोन सिंहांसमोर छातीठोकपणे उभा राहिला हा माणूस, लोक ओरडत राहिले पण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी