scorecardresearch

स्वत:ची आत्महत्या करुन त्याला बुडवायचे होते २ कोटी अन् प्रेयसीसोबत थाटायचा होता संसार, पण…

दोघांनाही कुठेतरी दूर जाऊन आपले नवं आयुष्य सुरू करायचं होतं. यासाठी सुशीलने पप्पू खान या नावाने एक बनावट आधार कार्डही देखील बनवलं होतं

स्वत:ची आत्महत्या करुन त्याला बुडवायचे होते २ कोटी अन् प्रेयसीसोबत थाटायचा होता संसार, पण…
स्वत:ला मृत घोषीत करुन बुडवायचे होते २ कोटी. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अनेक लोकांना आपलं आयुष्य ऐशोआरामात जगण्याची इच्छा असते. पण आयुष्य म्हटलं की कष्टला पर्याय नाही. शिवाय ‘श्रीमंत आणि यशस्वी बणण्यासाठी शॉर्टकट नसतो’ असं आपण अनेक वेळा बोलतो. मात्र, काही लोकांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं, यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. उत्तर प्रदेशमधून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने झटपट पैसै कमवण्यासाठी दोन कोटी रुपयांचे घेतलेले कर्ज बुडवण्यासाठी स्वत:ला मृत घोषीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या दुर्देवाने त्याचा हा प्लॅन यशस्वी न झाल्यामुळे आता त्याला तुरुंगाची हवा खायला लागली आहे.

नवभारतने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील सुशील गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने व्यवसायासाठी २ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, घेतलेले कर्ज फेडणे त्याला कठीण जात होते. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे या कर्जातून मुक्त व्हायचं होतं. म्हणून सुशील आणि त्याची प्रेयसी राणी या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवायचं ठरवलं.

हेही वाचा- ३७,००० फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडायचा म्हणून बाई हट्टाला पेटली; म्हणाली, ‘मला जीजसचा आदेश…’

त्यानुसार सुशीलने क्राईम पेट्रोल बघायला सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यानुसार त्याने एक कट रचला की, कोणत्याही प्रकारे त्याने स्वत:ला मृत सिद्ध केले आणि तो मेल्याची पोलिसांसह लोकांना खात्री पटली, तर त्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाचं ओझं नाहीसं होईल आणि उरलेलं आयुष्य प्रेयसीसोबत आनंदाने जगू असा प्लॅन त्याने तयार केला.

ठरवलेल्या प्लॅननुसार कृती –

दरम्यान, मनात तयार केलेल्या प्लॅननुसार त्याने प्रत्यक्षात कृती करायला सुरुवात केली. त्यानुसार त्याने आपला मित्र बहादूर सैनीच्या मदतीने एका दारुड्याला भेटले. त्याला दारूचं आमिष दाखवून कारमध्ये बसवलं आणि एका दूर ठिकाणी नेऊन दोघांनी त्या दारुड्याला बेशुद्ध होईपर्यंत दारु पाजली. त्यानंतर त्याला ड्रायव्हींग सीटवर बसवलं त्याला सीट बेल्ट लावला आणि कारला आग लावून दिली. शिवाय सुशीलने मुद्दाम त्याचा मोबाईल गाडीच्या सीटवर ठेवला, कारण आगीमध्ये मृत्यू झालेला व्यक्ती हा सुशील आहे असं पोलिसांना वाटावं. कारला आग लावून ते दोघे घटनास्थळापासून पळून गेले.

अन् मोबाईलमुळे तो सोपडला

हेही वाचा- पोलिस कोठडीत चाललेली कैद्यांची दारू-पार्टी; दोन पोलिस ताब्यात

मात्र, कारला आग लागल्याचं तिथे उपस्थित असलेल्या लोकांना दिसताच त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी जळत्या कारमधून दारु पिलेल्या व्यक्तीला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी दारु पिलेल्या व्यक्तीला बाहेर काढल्यामुळे सुशीलचा प्लॅन पूर्णपणे फसला, मात्र, गाडीमध्ये ठेवलेल्या मोबाईलमुळे त्याच्या या कटाचा पर्दाफाश झाला. दरम्यान, पोलिसांनी सुशील, त्याची मैत्रीण राणी आणि मित्र बहादूर सैनी यांना अटक केली असून पोलिसांनी सुशीलकडून १३ लाख पन्नास हजार रुपये, काही दागिने आणि दोन एटीएम कार्ड जप्त केली आहेत.

हेही वाचा- Viral Video: लग्नाला नकार दिला म्हणून मुलीचं अपहरण, मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या कुटुंबीयांवर रोखली बंदूक अन्…

पळून जाण्यासाठी बनवलं होतं बनावट आधार कार्ड –

दरम्यान, पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, सुशील आणि राणीचे अनेक दिवसांपासून अवैध संबंध होते. शिवाय दोघांनाही कुठेतरी दूर जाऊन आपले नवं आयुष्य सुरू करायचं होतं. यासाठी सुशीलने पप्पू खान या नावाने एक बनावट आधार कार्डही देखील बनवलं होतं. त्यामुळे लोकांनी झटपट श्रीमंत व्हायची स्वप्न बघू नये आणि कोणतही कर्ज बुडवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 14:49 IST

संबंधित बातम्या