scorecardresearch

VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण

सरयू नदीला वॉटर पार्क समजून केलेला रोमान्स या जोडप्याला चांगलाच महागात पडला. त्या दोघांना लोकांनी असा धडा मिळाला आहे की ते आयुष्यभर विसरणार नाहीत.

Husband-Kisses-Wife-Viral-Video
(Photo: Twitter/ ashoswai )

Husband Kissed her Wife in Ayodhya: अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. अशा स्थितीत अनेक भाविक तेथे दर्शनासाठी जातात. अयोध्येत सरयू नदीवर स्नान करत असताना पत्नीला किस करण्याचा प्रताप एका व्यक्तीला चांगलाच भोवलाय. अयोध्येत सरयू नदीत अंघोळ करताना एक व्यक्ती पत्नीसोबत रोमान्स करू लागला. हे पाहून लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

ही घटना मंगळवारी घडलीय. या व्हिडीओमध्ये एक जोडपे सरयू नदीत आंघोळ करताना दिसत आहे. महिलेला पोहायला येत नसल्यामुळे जोरदार प्रवाहाच्या भीतीने ती त्या व्यक्तीला धरून बसते. यादरम्यान पतीने पत्नीला किस केले. पण त्याच्या किस करण्याने लोक भलतेच त्याच्यावर तुटून पडले. पत्नीला केलेलं चुंबन एवढं जड जाईल याची त्याला कल्पना देखील नव्हती. त्याने सरयू नदीत अंघोळ करताना या व्यक्तीने पत्नीला किस केलेलं पाहून एकामागून एक जण मारहाण करू लागतात आणि काही सेकंदात ही हाणामारी सामूहिक मारहाणीत रूपांतर होते. सरयू नदीला वॉटर पार्क समजून केलेला रोमान्स या जोडप्याला चांगलाच महागात पडला. त्या दोघांना लोकांनी असा धडा मिळाला आहे की ते आयुष्यभर विसरणार नाहीत.

आणखी वाचा : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ढग कसे बनतात? हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेबाबत कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या दाम्पत्याचा आणि हल्ला करणाऱ्या कथित हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सरयू नदीच्या काठावर मंगळवारी योगा-दिनानिमित्त योगाभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हजेरी लावली. मंत्री गेल्याच्या दोन तासांनी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up crime news husband kisses wife while bathing in saryu river people thrashed fiercely prp

ताज्या बातम्या