काल्पनिक कारण सांगून सुट्टी मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. ही कारणं अनेकवेळा मजेदार आणि भन्नाट असतात. सध्या मात्र एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना एका आगवेळ्यावेगळ्या कारणासाठी रजा मागितली आहे. रागावून माहेरी गेलेल्या पत्नीचे मन वळवून तिला परत आणण्यासाठी या व्यक्तीने चक्क तीन दिवसांची रजा मागितली आहे. विशेष म्हणजे तसा रितसर अर्जदेखील त्याने केला आहे.

हेही वाचा >>> Heineken Beer Sneakers: शूज मध्ये बिअर, ‘हे’ नवे डिझाईन पाहिले का?

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे शिक्षण अधिकारी असलेल्या शमशाद अहमद यांनी रुसून माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी रजा मिळवी अशी मागणी केली आहे. या अर्जानुसार शमशाद यांनी ४ ते ६ ऑगस्ट अशा एकून तीन रजा द्यावी, अश विनंती आपल्या वरिष्ठांना केली आहे. माझी बायको आमच्या मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. या घटनेमुळे मी मानसिकदृष्ट्या दुखावलो आहे. त्यामुळे मला ४ ते ६ ऑगस्ट अशा तीन दिवसांसाठी प्रासंगिक रजा मिळावी, असे अहमद यांनी रजेच्या अर्जात नमूद केले आहे.

हेही वाचा >>> झोपलेल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली ही अजब पद्धत; VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

दरम्यान, सुट्टीसाठीचा हा आगळ्यावेगळा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या अर्जाला वाचून मजेदार कमेंट्स करत आहेत. याआधीही भन्नाट आणि मजेदार कारणं देऊन सुट्टी मागणारी बरीच उदारणं समोर आलेली आहेत. काही दिवसांपूर्वी दुसरीकडे नोकरी मिळावी यासाठी मुलाखत द्यायची आहे. त्यामुळे सुट्टी हवी आहे, अशी मागणी एका कर्मचाऱ्याने केली होती. या कर्मचाऱ्याच्या रजेचा अर्जदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.