UP Local Train Shocking Viral Video : हजारो लोक रोज मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलने प्रवास करून ऑफिस, शाळा, कॉलेज गाठणे हे अनेकांचे नित्याचे रुटीन झाले आहे. दरम्यान, मुंबईतच नाही तर इतर राज्यांमध्येही लोक लोकलने प्रवास करून ऐच्छिक ठिकाणे गाठताना दिसतात. परंतु, या प्रवासादरम्यान अनेकदा काही विचित्र घटनांचा सामना करावा लागतो. असाच एक विचित्र प्रकार लोकलच्या एका महिलांच्या डब्यात पाहायला मिळाला. एक अर्धनग्न अवस्थेतील पुरुष अतिशय वाईट प्रकारे महिलांकडे पाहून विचित्र हावभाव करीत होता.

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एका लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यातील आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक उंच पुरुष महिलांच्या डब्यात शिरून अश्लील चाळे करीत होता. सर्व महिलांकडे तो वाईट नजरेने पाहत होता. त्यानंतर तो हँडलला पकडून पुश-अप्स मारू लागला. मग ट्रेनच्या दरवाजावर जाऊन, तो पुन्हा सर्वांकडे पाहू लागला, त्याचे हे चाळे पाहून सीट्सवर बसलेल्या महिला घाबरून गेल्या होत्या. कारण- तो दिसतच इतका विकृत होता की, कोणाचीच हिंमतच झाली नाही त्याला ओरडण्याची. त्यानंतर स्टेशन जवळ येताच तो पुन्हा दरवाजाजवळ गेला, नंतर त्याने सीटमागील स्टिकर फाडले आणि ते अंगावर चिटकवले. पुढे स्टेशन येताच तो निघून गेला. सुदैवाने त्याने कोणालाही दुखापत केली नाही. संबंधित पुरुष मानसिक रुग्ण असल्याचा अंदाज आहे.

विकृत पुरुषाचा हा व्हिडीओ realsay_ana04 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काहींनी ही व्यक्ती एलियनसारखी का दिसतेय, असा प्रश्न उपस्थित केलाय. तर काहींनी व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याला सर्वांनी मिळून तुडवले पाहिजे होते, असे म्हटले.