ओ भाई! महाराष्ट्राचा फेमस नागीण डान्स एक्सक्लुझिव्ह नागीण डान्स जो महाराष्ट्राने शोधून काढलाय आणि तो कोणत्याही सणावाराला केला जातो. ह्या नागीण डान्समध्ये खूप स्टेप्स असतात. यात फण काढून नाचता येतं असतं, यात डान्स येत नसेल तर सरपटता येतं जमिनीवर, फार अंग हलवायला लागत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या नागिणीचे डान्स आपल्याला ह्यात करता येतात असा हा “फेमस नागीण डान्स”. लग्न असो किंवा मग कोणताही कार्यक्रम….तिथे नागीण डान्स झाला नाही असं शक्यच नाही. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात चक्क १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पोलिसांनी नागीण डान्स केलाय. ते ही थेट पोलिस स्टेशनमध्ये…होय. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल. पण हे खरंय.

या वर्षी देशाने ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यादरम्यान देशभरातून लोकांचे अनेक प्रकार समोर आले. या सगळ्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस चक्क पोलीस ठाण्यातच नागीण डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील पुरनपूर पोलिस स्टेशनचा आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस गारुडी बनून पुंगी वाजवताना दिसत आहे तर दुसरा हलावदार हा साप बनून गारुडी पोलिसाच्या तालावर फणा काढत नागीण डान्स करताना दिसून आला. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करताना पोलिसांनी अशा हटके पद्धतीने देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केलाय.

आणखी वाचा : एका तुटलेल्या पुलावरून पठ्ठ्यानं केली रॉयल एनफिल्डची स्वारी, VIRAL VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या चिमुकल्या मुलीने इतकं भन्नाट लोकनृत्य सादर केलंय की तुम्ही पाहतच राहाल!

हे पाहून पुरणपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अशोक पाल यांनी नागीण डान्सची धून बंद केली होती. त्यांनी गाणे वाजवणाऱ्या व्यक्तीला फक्त देशभक्तीपर गाणी वाजवण्याची सूचना केली. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र याबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. याबाबत कोणी तक्रार केल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही वरीष्ठांकडून सांगण्यात आलं आहे.