Bull attack video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडीओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात की, जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरविणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चवताळलेला बैल आणि गाईची भरबाजारातच झुंज सुरू झाली. दरम्यान, यावेळी पिसाळलेल्या जनावरांच्या तावडीत एक तरुण सापडला. गाय आणि बैल झुंजत असतानाच त्या तरुणावर जाऊन पडले. त्यानंतर तरुणाचं काय झालं पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गाई, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापाच्या भरात हल्ला करताना दिसून येतात. नुकताच एका संतापलेल्या बैलाचा व्हिडीओ समोर आलाय. दरम्यान, बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या तरुणानं ज्या पद्धतीनं प्रयत्न केले आहे, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरबाजारात गाय आणि बैलामध्ये थरारक अशी झुंज लागते. यावेळी गाय आणि बैल दोघेही या भांडणात आजूबाजूच्या दुकानाला धडकताना दिसत आहेत. या दोघांची झुंज इतकी भयानक होती की, यामध्ये कुणीही आला, तर तो जीवानिशी जाऊ शकेल, अशी परिस्थिती होती. दरम्यान, एक तरुण या दोन्ही जनावरांमध्ये अडकला. गाय आणि बैलामध्ये झालेली भयंकर लढाई पाहून हा तरुण स्वत:चं दुकान बंद करायला गेला अन् तेवढ्यात गाय आणि बैल झुंजता झुंजता त्या तरुणावर जाऊन पडले. त्यामुळे हा तरुण अक्षरश: उडून पडल्याचं दिसत आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> Video: अचानक रस्ता खचला, पाईपलाईनही फुटली अन् खड्ड्यात पडून नगरसेवकासह ६ जण जखमी; भयानक दृश्य कॅमेरात कैद दरम्यान, त्यानंतरही तरुणानं प्रसंगावधान दाखवीत लगेचच शेजारी असलेल्या दुकानात उडी मारली आणि त्या दुकानाचं शटर बंद केलं; अन्यथा त्या तरुणाचं काही खरं नव्हतं. सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे होत असते. सोशल मीडियावर Arun3 नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.