यूपीएससी परीक्षेतील ‘टॉपर्स’ एकमेकांच्या प्रेमात

ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटात किंवा कथा-कादंबरीमध्ये शोभणारी आहे.

UPSC no. 2 , Love stories , UPSC , Exam, education, Aamir Khan upsc, Tina Dabi upsc, UPSC topper , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
UPSC toppers : सध्या टीना आणि आमिरची प्रेमकहाणी चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. काश्मीरमधील एका लहानश्या खेड्यातून आलेल्या आमिर आणि मागास समाजातील टीनाने यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
तो पहिल्याच भेटीत माझ्या प्रेमात पडला, ही प्रतिक्रिया आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून प्रथम येणाऱ्या टीना दाबीची. टीना दाबीची ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटात किंवा कथा-कादंबरीमध्ये शोभणारी आहे. कारण, तिच्या प्रेमात पडणारा दुसरा तिसरा कोणी नसून यूपीएससीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणारा अतहर आमिर उल शफी खान आहे. टीना आणि आमिर दिल्लीच्या केंद्रीय मनुष्यबळ खात्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात पहिल्यांदा भेटले आणि त्याच संध्याकाळी त्याची स्वारी थेट टीनाच्या घरी जाऊन पोहचली. आमिरने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे सध्या टीना आणि आमिरची प्रेमकहाणी चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

काश्मीरमधील एका लहानश्या खेड्यातून आलेल्या आमिर आणि मागास समाजातील टीनाने यूपीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता या दोघांची प्रेमकहाणीही तितक्याच चर्चेचा विषय ठरत आहे. आमिर आणि टीना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांनीही त्यांच्यातील प्रेमसंबंधाबद्दल कोणताही आडपडदा ठेवलेला नाही. टीनाने सोशल मिडीयावर आमिरसोबतची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. मात्र, मध्यंतरी यावरून फेसबुकवरील काहीजणांनी टीनावर टीका केली होती. अनेकांनी तिच्या आमिरसोबत असलेल्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आम्ही प्रेमात आहोत आणि मी खूप आनंदी आहे. मात्र, फेसबुकवर जेव्हा आमच्याविरोधातील गोष्टी वाचायला मिळतात, तेव्हा मला मनस्ताप होतो. त्यामुळे सध्या आम्ही सोशल मिडीयावरील आमच्याबद्दलच्या बातम्या वाचणेच थांबवले आहे. माझ्या मते लोकांच्या नजरेत असल्यामुळे आम्हाला ही लहानशी किंमत मोजावीच लागेल, असे टीनाने म्हटले.

dabi
टीना दाबी मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. टीना दाबीने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत अव्वल येण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे टीना माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव, अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत निरुपमा राव यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.

dabi5

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Upsc no 2 aamir khan loses top rank to tina dabi wins her heart