ओला इलेक्ट्रिकबाबत ग्राहकांकडून काही समाधानकारक प्रतिक्रिया मिळत नाहीत. ओला इलेक्ट्रिकला लागलेल्या आगीनंतर अनेक वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, ओला ई-स्कूटरबाबत आणखी एक विचित्र प्रकरण समोर आली आहेत. यात ई-स्कूटर रस्त्यात मध्येच बंद पडल्यानंतर एक व्यक्ती इतका संतापला की त्याने चक्क आपली ईव्हीच पेटवनू टाकली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तामिळनाडूमधला आहे. पृथ्वीराज गोपीनाथन असे या व्यक्तीचे नाव असून तो अंबुर येथील फिजिओथेरपिस्ट आहे. ईव्हीने प्रवास करत असताना अचानक त्यांची ही बाईक रस्त्यात बंद पडली. ओला एस१ प्रो चे मालक डॉ. पृथ्वीराज हे त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकच्या एकूण कामगिरी आणि रेंजवर नाराज होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी बाईक खरेदी केली होती. बाईक घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच बाईकची बॅटरी खराब झाली आणि रस्त्यात बंद पडली. यामुळे डॉ. पृथ्वीराज यांनी संपातून त्यांच्या बाईकलाच आग लावली.

आणखी वाचा : ट्रकखाली चिरडण्यापासून बाळाला वाचवणाऱ्या आईचा VIDEO VIRAL

शिवाय, त्या व्यक्तीने यापूर्वी याच समस्येबाबत ओला इलेक्ट्रिककडे तक्रार केली होती. ओला सपोर्टने स्कूटरची तपासणी केली आणि ती चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले. मात्र ४४ किलोमीटरनंतर ई-स्कूटर बिघडल्याने त्या व्यक्तीने संतापून आपली ईव्ही पेट्रोल ओतून पेटवून दिली. तामिळनाडूतील अंबूर बायपास रोडजवळ ही घटना घडली. अलीकडेच कंपनीने ई-स्कूटर्सचे १,४४१ युनिट्स परत मागवले आहेत.
गोपीनाथन यांनी ट्विटरवर ओला इलेक्ट्रिक बाइक जळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल, एथर एनर्जी, हीरो इलेक्ट्रिक तसंच यूएसचे अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला टॅग केलं आहे.

आणखी वाचा : फुल विकणाऱ्या एका काश्मिरी व्यक्तीने म्हटला ‘Pushpa’ चा फेमस डायलॉग, लोक म्हणाले, “यात फायर जास्त आहे!”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना तो म्हणाला की, त्याने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर एजन्सीने त्याला बोलावले आणि मीडियामध्ये मुलाखती न देण्याची विनंती केली. तसंच बाईक बदलून देण्याचे आश्वासन दिले. पण, तो म्हणाला, “मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मी बाईक पेटवताच त्याच्या कंपनीशी माझे नाते संपलेले आले. पण तो पुढे म्हणाला की एक टीम आधीच नवीन ई-बाईक घेऊन अंबुर येथील त्याच्या क्लिनिकसाठी रवाना झाली आहे आणि आज रात्री बाईक वितरित करण्याचे वचन दिले आहे.”

ई-बाईकमध्ये आगीच्या घटना
गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक बाइकला आग लागण्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत सरकार याकडे लक्ष देईल असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये काही समस्या निर्माण होत आहेत. गडकरी म्हणाले की, देशातील ईव्ही उद्योगाने नुकतेच काम सुरू केले आहे आणि सरकार त्यांच्यासाठी कोणताही अडथळा निर्माण करू इच्छित नाही. मात्र सरकारसाठी सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.