Pune Advertising goes viral: गणेशोत्सव म्हटलं की तरुणाईचा जल्लोष येतोच. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तांमध्ये नवचैतन्य पसरते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ याच जयघोषात आज बाप्पााला निरोप दिला जाणार आहे. बाप्पाला निरोप देतानाही नाचत-गाजत मिरवणूक काढत पुढल्या वर्षी लवकर या अशी साद गणरायाला घातली जाते.गेल्या काही वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणूक तासनतास निघते. लालबागचा राजा असो वा पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका तब्बल १६-१८ तास चालतात. ढोलताशे, वाद्यांच्या तालावर तरुणाई बेभान होऊन नाचते. याच मिरवणुकीसाठी आता पुणेकरांनी एक अशी जाहिरात दिलीय की वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. ही जाहिरात सध्या व्हायरल होत आहे.

पुणे तिथे काय उणे

Pune news : punekar boy urged to return stolen scooty as it is last memory of his mother
आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक
Puneri pati viral puneri pati outside parlour goes viral on social media
PHOTO: “आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुली…” पुण्यात पार्लरबाहेर…
viral video two girl students beat st bus conductor with slippers for molestation in ratnagiri
VIDEO: “अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल”, रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड; मुलींनी दाखवला दुर्गावतार
Rain will stop for a time but not garba young girl playing garba-dandiya in heavy rain
“एक वेळ पाऊस थांबेल पण गरबा नाही”, भरपावसात गरबा-दांडिया खेळत आहे तरुण तरुणी, Viral Video
grandmother dance in wedding video
“बाया झायल्या गार गं” साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा खांद्यावर बसून तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
Shocking A large tank of water fell on the woman's head from the terrace video
भयंकर! रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या डोक्यात टेरेसवरुन पडली पाण्याची टाकी; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
Pune Video What is special about Pune
Pune Video : “काय खास आहे तुमच्या पुण्यामध्ये?” मग एकदा हा VIDEO पाहाच
boy stunt for publicity
“आई घरी वाट बघत असेल…” प्रसिद्धीसाठी तरुणांचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
jaipur Driverless burning car video
भयानक दृश्य! चालकाविना रस्त्यावर सुसाट धावतेय जळती कार; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात जातात. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, पुण्यातील ही जाहिरात भलतीच चर्चेत आली आहे. पुणेरी स्पीक नावाच्या एका ट्विटर युजरने ही जाहिरात पोस्ट केली आणि पाहता पाहता यावर अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या. ही जाहिरात पाहून तुम्हीही म्हणाल पुणे तिथे काय उणे..

जाहिरातीत नेमकं काय लिहलंय ?

“गणपती विसर्जन गर्दीमध्ये गणपती डान्स करण्यासाठी फक्त १ दिवस दि. २७ सप्टेंबर १०० मुले मुली पाहिजेत. वय १८ ते ३०, वेळ संध्याकाळी ५ ते १० स्थळ भोसरी, पे ३०० पर डे” असं म्हणत संबंधित मोबाईल नंबर दिला आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. दरम्यान आता पुणेरी जाहिरातीचीही सगळीकडे चर्चा सुरु आहे. याच जाहिरातीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. खरं तर ही जाहिरात जुनी आहे. पण आज गणपती विसर्जनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्हायरल होतेय.

पाहा जाहिरात

हेही वाचा >> नाश्त्याला आवडीने पोहे खाताय? ‘हा’ प्रकार पाहून पोहे खाताना १०० वेळा विचार कराल; पाहा किळसवाणा PHOTO

पुणेकरांचा नाद नाय! 

@PuneriSpeaks नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोखाली नेटकरी वेगगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “जेवण नाश्ता देणार का नाही?” “मधेच थांबलो तर पैसे कट? करणार का” “आला बाबुराव गाणं वाजवणार असाल तर..आम्ही स्वखर्चानी येऊ” “पुणेकरांचा नाद नाय!” “नोकरी मिळवण्यासाठी डान्स करून दाखवावा लागेल का?” अशा अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.