scorecardresearch

प्रसिद्ध कलाकाराने बनवलेल्या ३४ लाखांहून अधिक किंमतीच्या मुर्तीचे क्षणात झाले तुकडे; Video पाहून व्हाल थक्क

एक महिलेने मूर्ती बलूनची आहे की नाही हे तपासण्यासाठी उचलली होती

USD 42,000, balloon dog sculpture
अमेरिकेतील मियामी येथे सुरू असलेल्या आर्ट फेअरमध्ये मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Facebook, Twitter)

अमेरिकेतील मियामी येथे सुरू असलेल्या आर्ट फेअरमधील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल यात शंका नाही. कारण प्रसिद्ध कलाकार जेफ कून्स यांनी बनवलेली मुर्ती एका महिलेकडून फुटले आहे. आता एखादे मुर्ती फुटली यात एवढं काय विशेष आहे? असं तुम्ही म्हणाल, परंतू ते फुटलेल्या मूर्तीची किमंत ऐकूण तुम्हाला धक्का बसेल.

एएफसीच्या रिपोर्टनुसार, मियामी येथे आयोजित आर्ट वेनवु़ड येथील कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. एका महिलेने मूर्ती बलूनची आहे की नाही हे तपासण्यासाठी उचलली असता ती फुटली. तर या फुटलेल्या “बलून डॉग”ची किंमत ४२ हजार डॉलर म्हणजेच ज्याची किंमत सुमारे ३४.७ लाख इतकी आहे. तर या घटनेत झालेली आर्थिक हानी विम्याद्वारे करण्यात येणार आहे.

हेही पाहा- भलता स्टंट करण्याच्या नादात तरुणी तोंडावर आपटली, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेली मुर्ती प्रसिद्ध कलाकार जेफ कून्स यांनी बनवलेले होते. या महिलेकडून मूर्ती पडताच तिथे मोठा जमाव जमला होता. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणाक व्हायरल होत आहे. शिवाय जेव्हा एक चमकदार निळी मूर्ती फुटली तेव्हा लोकांना वाटले की हा स्टंट आहे. मात्र नंतर ती खरोखर फुटली असल्याचं समजलं.

कशी तुटली मूर्ती ?

या आर्ट फेअरमध्ये फुटलेली मूर्ती दोन दशके जुनी असून ती सुमारे १५ इंच उंच होती. एक महिला विजिटर मूर्तीला पकडायला गेली असता ती फुटली. फुटलेली मुर्ती लॉस एंजेलिसमध्ये मिरर-पॉलिश स्टेनलेस स्टीलपासून बनविली गेली होती. कलाकार स्टीफन गॅमसन यांनी मियामीमध्ये पत्रकारांना सांगितले की, “मी पाहिलं की त्या मुर्तीजवळ एक महिला गेली होती आणि ती त्या मुर्तीला हात घेऊन पाहात असतानाच अचानक तिचे तुकडे झाले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 14:40 IST