अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सतत चर्चेत असतात. सध्या बायडेन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोलोरॅडो येथे पार पडलेल्या एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की जो बायडेन पाय अडखळून पडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गुरुवारी कोलोरॅडोमध्ये पार पडलेल्या यूएस एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात जो बायडेन उपस्थित होते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्यानंतर ते पुढे सरकले आणि अडखळून पडले.
पडल्यानंतर लगेच एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उचलले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संदर्भात ‘व्हाइट हाऊस’ने एका निवेदनात सांगितले की राष्ट्राध्यक्ष बायडेन आता ठीक आहेत.

हेही वाचा : Viral Video : रस्ता आहे की कार्पेट; संतापलेल्या ग्रामस्थांनी चक्क हाताने उचलला रस्ता, पहा धक्कादायक व्हिडीओ

कार्यक्रमानंतर जो बायडेन जेव्हा परत व्हाइट हाऊसला जात होते तेव्हा त्यांना काही स्थानिक पत्रकारांनी विचारले, “तुम्ही ठीक आहात का?” तेव्हा मी ठीक असल्याचे बायडेन यांनी सांगितले.

हेही वाचा : Viral Video : चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुणांचा रोमान्स; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
जो बायडेन हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वांत वयस्कर अध्यक्ष आहेत. ते सध्या ८० वर्षांचे आहेत पण तरीसुद्धा ते खूप फिट आणि हेल्दी आहेत.