scorecardresearch

Firing In Marraige : लग्नात नवरदेवाने नवरीचा हात पकडत हवेत केली फायरिंग; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन आता संबंधितांच्या शोधात लागले आहेत. या व्हिडीओची पडताळणी करून संबंधितावर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

bride-groom-pistol-firing-in-air-viral-video
(Photo: Twitter/ Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर)

लग्नात बंदुक चालवणं ही जणू परंपराच झाली आहे. काही लोकं आपली शान किंवा श्रीमंती दाखवण्यासाठी लग्नात गोळीबार करतात. मोठेपणा मिरवण्यासाठी केलेला हा प्रकार काही वेळेस वऱ्हाड्यांच्या जिवावर देखील बेततो. अशा अनेक घडना घडल्याचं समोर आलं आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेव नवरीचा हात पकडत बंदूकीने हवेत गोळीबार करताना दिसत आहे. नवरदेवाने फायरिंग केल्यानंतर काय घडलं पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा नवरी लग्नाच्या मांडवात आहेत. सुरूवातीला व्हिडीओ पाहून असं वाटतं ही नवरा नवरी हे फोटोसाठी उभे आहेत. पण थोड्या वेळाने या व्हिडीओमधील नवरदेवाच्या हातात एक बंदूक असल्याचं दिसून येतं. नवरदेव आपल्या हातातली बंदूक आकाशाच्या दिशेने करतो आणि त्याच्यासोबत बाजुला उभी असलेली नवरी सुद्धा त्याला साथ देते. नवरदेवाने नवरीचा हात पकडत बंदूकीतून हवेत गोळीबार करण्यास सुरूवात केली. एक दोनदा नव्हे तर लागोपाठ चार वेळा हे नवरा नवरी बंदूकीतून हवेत गोळीबार करताना दिसून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

हा व्हिडीओ गाजियाबादमधल्या घंटाघर कोतवाली क्षेत्रमधला असल्याचं सांगण्यात येतंय. घंटाघर कोतवाली क्षेत्रमधल्या एका मॅरेज हॉलमध्ये शुक्रवारी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ त्या लग्नातला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये जोरजोरात गाणं वाजत असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला धडकन चित्रपटातलं गाणं वाजत असल्याचं ऐकायला मिळतंय. ज्यावेळी नवरा नवरी हवेत गोळीबार करू लागले त्यावेळी त्यांना कुणीच रोखलं नाही. याउलट त्यांच्यासोबत ते आनंद साजरा करताना दिसून आले.

आणखी वाचा : विमानात डान्स करणाऱ्या ‘त्या’ एअर हॉस्टेसचा नवा VIDEO VIRAL; Jugnu Dance चॅलेंज स्वीकारून साऱ्यांना केलं घायाळ

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घाबरून मुलगी म्हणाली, “माझं अजुन लग्न झालेलं नाही”, यावर उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल

लग्न सोहळ्यात आनंदात करण्यात येणाऱ्या गोळीबारवर बंदी आणली असून असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करूनही लोकांची सवय सुटत नाही. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच अशा हर्ष फायरिंगदरम्यान लग्नात आलेल्या पाहूण्याच्या पोटाला चुकून गोळी लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर लोक अशा घटनेतून बोध घेत नाही आणि अशा धोकादायक सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

आणखी वाचा : भारीच! चोरांपासून नवी कोरी कार लपवण्यासाठी पठ्ठ्यानं केला असा जबरदस्त जुगाड; हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन आता संबंधितांच्या शोधात लागले आहेत. या व्हिडीओची पडताळणी करून या घटनेची पोलिस चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh ghaziabad news the bride and groom fired in the air at the wedding police took cognizance of the viral video bride groom pistol firing google trending video prp

ताज्या बातम्या