Premium

शिक्षकांनाही चढली रील्सची झिंग! शिकवणी सोडून शाळेतच बनवतात व्हिडीओ; लाईक अन् शेअरसाठी विद्यार्थ्यांवर टाकतात दबाव

सोशल मीडियावर काही शिक्षकांचा शाळेत शिकवणी सोडून रिल्स बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स आता संताप व्यक्त करत आहेत.

uttar pradesh teachers filmed Instagram Reels in schools forced students to follow accounts
शिक्षकांनाही चढली रील्सची झिंग! शिकवणी सोडून शाळेतच बनवतात व्हिडीओ; लाईक अन् शेअरसाठी विद्यार्थ्यांवर टाकतात दबाव ( सोशल मीडिया)

रील शूट करीत ती सोशल मीडियावर अपलोड करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. केवळ लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांच्याही डोक्यात रील्सच्या माध्यमातून फेमस होण्याचे भूत शिरले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रील्स व्हिडीओंना लाइक्स आणि शेअर्स वाढवण्याची स्पर्धा सुरू आहे. पण, आता शिक्षकांनाही रील्स बनवण्याची झिंग चढल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकांना रील्स स्टार बनण्याचे इतके वेड लागले होते की, त्यांनी शिकवणी सोडून चक्क शाळेत व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर त्यांनी रील्स व्हिडीओ लाइक्स आणि शेअर करण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकला. हे प्रकरण लक्षात येताच पालकांनी संबंधित शिक्षिकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांवर व्हिडीओ लाइक्स करण्यासाठी दबाव

अमरोहा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून रोज रील्स बनवायच्या. यावेळी एक शिक्षक त्यांचे रील्स शूट करायचे. इतकेच नाही या शिक्षिका त्यांच्या रील्स व्हिडीओ लाइक आणि शेअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्टाग्राम अकाउंट ओपन करण्यासाठी भाग पाडत होत्या, असा आरोप केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh teachers filmed instagram reels in schools forced students to follow accounts sjr

First published on: 30-09-2023 at 13:40 IST
Next Story
९ वर्षाच्या लेकीच्या काखेत दुपारी दुखू लागलं, रात्री ओठ जांभळे पडले मग.. आईने सांगितलेली कहाणी वाचून व्हाल सुन्न