ऐन लग्न समारंभादरम्यान नवऱ्याच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी स्टेजवर आलेल्या नवरीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी ही दु:खद घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माणसावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात. अशीच एक घटना समोर आली असून उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका लग्न सोहळ्याचा आनंद काही क्षणात दु:खात बदलला आहे.

कारण, लग्न समारंभादरम्यान पतीच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी स्टेजवर आलेली वधू अचानक बेशुद्ध पडली. बेशुद्ध वधूला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यामुळे दोन्ही कुटुंबीयांच्या आनंदाचं रुपातंर क्षणात दु:खात झालं. मिळालेल्या माहितीनुसार, भदवाना गावचे रहिवासी राजपाल शर्मा यांची मुलगी शिवांग आणि लखनऊतील बुद्धेश्वर येथील फर्निचर कामगार विवेक यांचं लग्न ठरलं होतं.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही
mouthwash
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये? मग घरी बनवलेल्या माउथवॉशने करा गुळण्या, तुमचा श्वास नेहमी राहील ताजा

हेही पाहा- Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…

लग्नाच्या तिथीनुसार शुक्रवारी रात्री बुद्धेश्वर येथे वऱ्हाड दाखल झालं होतं. शिवाय मुलाकडील मंडळींचे जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. एकंदरीतच लग्नामुळे परिसरातील वातावरण आनंदाचं आणि उत्साहाच बनलं होतं. दोन्हीकडील मंडळी लग्नाच्या धामधूमीत व्यस्त होती. याच वातावरणात लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं. शिवाय लग्ना समारंभातील इतर विधी झाल्यानंतर वरमाला घालण्यासाठी वधू-वराला स्टेजवर आणण्यात आलं. वरमाला घालण्याचे काही विधी केले जात असताना कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वधू शिवांगीला स्टेजवरील एका खुर्चीवर बसायला सांगितलं.

हेही वाचा- हृदयद्रावक: पोलिसांनी फेकलेला तराजू उचलण्यासाठी गेलेल्या भाजीविक्रेत्याला गमवावे लागले दोन्ही पाय

ती खुर्चीवर बसत असतानाच अचानक बेशुद्ध पडली. नवरी स्टेजवरच बेशुद्ध पडल्यामुळे कुटुंबातील लोकं खूप घाबरले. शिवाय भर मंडपात भितीचं वातावरण निर्माण झालं. कुटुंबातील सदस्यांनी बेशुद्ध वधूला तत्काळ रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यामुळे ऐन लग्नात दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे काही मिनिटांत सर्व आनंदाचे रूपांतर दु:खात झालं आणि जो नवरदेव वरात काढून आनंदाने नाचत जाणार होता त्याच्यावर कुटुंबीयांसह मृत नवरीच्या अंतयात्रेत सहभागी होण्याची वेळ आली.