video viral: रिल्सचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर; गंगा नदीत शेवटी…

Viral video: सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात.

young man drowned in river ganga
रिल्स बनवताना सावधान! (Photo- Twitter)

रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

रिल्स बनवणं बेतलं जिवावर –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो गंगा नदीमध्ये दोन जण पोहताना दिसत आहेत. हे दोघेजण वारंवार पाण्यात डुबकी मारत आहेत. आपण पाहिलं तर तसं पाण्याचं प्रमाणही जास्त आहे. मात्र तरीही हे दोघे जण जिवाची कसलीही पर्वा न करता बिंधास्त पोहत आहेत, आणि त्याचवेळी पाण्याच्या बाहेरील एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत आहे. दरम्यान अचानक त्या दोघांमधील एक जण पाण्यात बुडू लागतो. सुरुवातीला हा व्यक्ती पोहतो आहे असं दिसतंय मात्र काही वेळाने त्याच्या मित्रांना तो खरचं बुडत असल्याचं लक्षात येत आणि ते त्याच्या मदतीला धावतात. मात्र तो पर्यंत तो तरुण बुडतो. त्यामुळे पाण्यासोबत खेळताना काळजी घेणे गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: पूजा सुरु असतानाच भाविक पडले 50 फूट खोल विहिरीत; अनेकजण थेट…

तुम्ही जर रील्स बनवत असाल तर ज्याठिकाणी तुम्ही रील्स बनवत आहात तो परिसर तुमच्यासाठी सुरक्षित तर आहे ना? याची रील्स बनवणाऱ्याने खबरदारी घेतली पाहिजे .

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 16:26 IST
Next Story
Video: पूजा सुरु असतानाच भाविक पडले 50 फूट खोल विहिरीत; अनेकजण थेट…
Exit mobile version