Uttarakhand accident video: तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा एक असा व्हिडीओ, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. २५ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील ५ सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहुयात. उत्तराखंडमधून हा व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क आलीच. कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो. त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रत्यक्षात हे ऐकताना कुणीही दिसत नाही.

Auto Bike Car Accident
विचित्र अपघात! एक वेळ अन् एकच ठिकाण…१८ सेकंदात घडले नेमके काय; पुण्यातील अपघाताचा LIVE VIDEO
Water Increased Many People Drowing In Water Scary Video Viral
मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…
heartbreaking video 3 best friends hug each other before being swept away by river flood water in italy shocking video viral
‘ती’ मिठी ठरली शेवटची! पुराच्या पाण्यात अडकले अन् ‘असा’ झाला तीन जिगरी दोस्तांचा करुण अंत; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Bride and groom trolled for setting themselves on fire during wedding in US
आगीच्या ज्वाळासंह नवरा नवरीची लग्नात एन्ट्री, फोटोशूटसाठी जीव टाकला धोक्यात, Stunt Video Viral
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
The driver in the car and the car fell down the mountain
VIDEO: काळ आला होता पण वेळ आली नव्हती…नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, थरकाप उडवणारा अपघात
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

उत्तराखंडमध्येही अती घाईमुळे असाच एक भीषण अपघात झाला. चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा थरारक अपघात झालाय. भाविकांना घेऊन जाणारी बस डोंगरावर आदळल्याने मोठा अपघात टळला. बुधवारी कर्णप्रयागमधील नंदप्रयाग पुरसाडीजवळ दोन बसेसच्या धडकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये बद्रीनाथच्या दिशेने जाणाऱ्या बसला ऋषिकेशकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. बसमध्ये प्रवास करणारे लोक जखमी झाले. मागून येणाऱ्या वाहनात बसलेल्या लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> घाटकोपर दुर्घटनेनंतरचं भयान चित्र; रेस्क्यू ऑपरेशनचा अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO समोर

उत्तराखंड हे पर्वतीय राज्य आहे. त्यामुळे येथील रस्ते अतिशय वळणदार आहेत. म्हणजेच ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग फिरवत राहावे लागते. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला शेकडो फूट दरी आहे. जेथे लक्ष थोडेसे विचलिक झाले की अपघात होणे साहजिकच आहे. एकतर गाडी डोंगराला धडकेल किंवा खड्ड्यात पडेल. दरी देखील शेकडो मीटर खोल आहे. अनेक ठिकाणी दरीखाली नदी आहे

निसरडे रस्ते उत्तराखंडमध्ये डोंगराळ भागातून असलेल्या रस्त्यांवर नेहमी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे कितीही चांगला रस्ता तयार केला तरी तो जास्तकाळ त्या स्थितीत राहत नाही. अशावेळी खराब रस्त्यावरुनच गाडी चालवावी लागते. त्यामुळे गाडीच्या टायरला चांगली ग्रीप मिळत नाही. परिणामी मोठे अपघात होतात.