scorecardresearch

Premium

Uttarkashi video: शेवटी बापाचं काळीज! माझं रोपटं वाचलं; १७ दिवसांनंतर लेक बाहेर येताच वडिलांना अश्रू अनावर

Uttarkashi Tunnel Rescue video: १७ दिवसांनंतर लेक बाहेर येताच वडिलांना अश्रू अनावर

tarkashi rescue operation: A father got emotional
१७ दिवसांनंतर लेक बाहेर येताच वडिलांना अश्रू अनावर ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

Uttarakhand tunnel: उत्तराखंडमधील एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. मंगळवारी रात्री तब्बल १७ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ४१ मजुरांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, यामध्ये बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कामगार आतमध्ये अडकले होते, मात्र बाहेर त्यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला होता. अशाच एका कामगाराच्या वडिलांचा भावूक करणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. आपला मुलगा अखेर सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा बोगद्यातून बाहेर आल्यानंतर वडील भावूक झाले आहेत. या वडिलांचे बोलणे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. या कामगाराच्या वडिलांना जेव्हा विचारलं की तुमचा मुलगा सुखरुप बाहेर आला आहे आता तुम्हाला कसं वाटतंय? यावर त्यांनी “माझं रोपटं वाचलं अजून काय पाहिजे” असं उत्तर दिलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावर ते “हे तर आनंदाचे अश्रू आहेत” असं म्हणाले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DrRPNishank नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला “वडिल आपला मुलगा बाहेर पडल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहे.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray
“२५ वर्षांत मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड….”, देवेंद्र फडणवीसांची टीका
Father gets Emotional Seeing Her Son In Police Uniform Video Viral On Social Media
VIDEO: …त्यादिवशी वडील पहिल्यांदा रडले; लेकानं वर्दीत सलाम ठोकताच वडिलांना अश्रू अनावर…
nashik assaulted accused sentenced in jail woman denied marriage
नाशिक : युवतीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला पाच वर्ष तुरुंगवास
Video: 25-Year-Old Agra Man Dies Of Heart Attack While Working In Sweet Shop
मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडणारा आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘भावनिक व्हिडिओ.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘अखेर मृत्यू हरला जिद्द जिंकली!

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Uttarakhand tunnel: “अन्नाचा पहिला घास खाल्ला आणि…” ४०० तास बोगद्यात अडकलेल्या कामगारानं सांगितला “तो” अनुभव

कोणत्या यंत्रणा बचाव कार्यात सहभागी?

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी होत्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttarkashi rescue operation a father got emotional as he got the news of his trapped sons rescue from the uttarkashi tunnel collapse emotional video viral srk

First published on: 29-11-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×