बॉलीवूड आणि भारतीय संस्कृती ही फक्त भारतीय प्रेक्षकांपुरती मर्यादीत नाही. जगभरात अनेक देशातील नागरिकांना बॉलीवूडचे आणि भारतीय संस्कृतीचे आकर्षण आहे. बॉलीवूड चित्रपट आणि गाणी परदेशी नागरिकांना अनेकदा भूरळ पाडतात. बॉलीवूड गाण्यावर नाचणाऱ्या किंवा गाणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पाकिस्तानमधील लग्नसोहळ्यात भारतीय गाण्यावर थिरकणारे लोक दिसतात तर कधी जपानमध्ये बॉलीवूड गाण्यावर लोक थिरकताना दिसतात. अनेकदा बॉलीवूड गाणे गाताना दिसतात. आता या यादीत उझबेकिस्तानची देखील भर पडली आहे. सोशल मीडियावर सध्या उझबेकिस्तानमधील चिमुकले बॉलीवूड गाण्यावर नाचत असल्याची काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उडे उडे जब जब जुल्फे तेरी, दिल लगा लिया मैंने तुमसे प्यार करके, इश्क कमीना, डिस्को डान्सर, मल्हारी, मै शायर तो नहीं, डोला रे डोला अशा कित्येक जुन्या आणि नव्या गाण्यावर उझबेकिस्तानमधील चिमुकले डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी गाण्यावर फक्त डान्स केला नाही तर प्रत्येक गाण्याचे हुबेहुब अनुकरण केले आहे. कपडे, डान्स स्टेप, सेट, अभिनय सर्व काही अगदी हुबेहुब. सोशल मीडियावर हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चिमुकल्यांनी भारतीयांचे मन जिंकले आहे.

उझबेकिस्तानमधील मुलांनी आत्मविश्वासाने स्टेजवर थिरकले

व्हिडिओमध्ये सुंदर सजवलेला स्टेज दिसत आहे. पार्श्वभूमीत गाण्यानुसार सजावट असल्याने केलेली दिसत ाहे. मुलींनी लेहेंगा-चोळी आणि दुपट्टा परिधान केला आहे, तर काही मुलांनी भारतीय पारंपरिक कपडे घातले आहेत. ही सर्व मुले आत्मविश्वासाने हसत-खेळत नृत्य सादर करताना दिसतात. त्यांच्या हावभाव आणि समन्वय पाहून ते भारतापासून हजारो किलोमीटर दूर आहेत, यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.

भारतीय संस्कृतीची जागतिक झलक

बॉलीवूड गाणी भारतात जितकी लोकप्रिय आहेत, तितकीच ती परदेशातही ऐकली जातात. मात्र या व्हिडिओने विशेष लक्ष वेधले कारण मुलांनी गाण्यांचा भाव आणि शैली अगदी अचूकपणे सादर केली आहे. त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स मूळ गाण्यांच्या कोरिओग्राफीसारख्याच दिसतात.

हा कार्यक्रम पाहताना एखाद्या भारतीय शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाची आठवण येते. जरी हा कार्यक्रम उझबेकिस्तानमध्ये झाला असला, तरी या चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून अनेक भारतीयांचे मन जिंकले आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेक युजर्स कमेंट करत या चिमुकल्यांचे कौतुक करत आहेत.

काहींनी लिहिले की, “भाषा वेगळी असली तरी संगीत मनांना जोडते.” तर काहींनी मुलांच्या निरागसतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले.

हा व्हिडिओ kam_ziron या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.