Vaishnavi Hagawane video viral: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणारी मारहाण आणि छळाला कंटाळून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असतानाच वैष्णवीच्या डोहाळे जेवणाआधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाआधी वैष्णवी मेकअप करतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जातोय. पुढे ती छान नटली आहे, आणि बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक ही दिसत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याआधी वैष्णवीनं घेतलेल्या उखाण्याच्या व्हिडीओनंही लक्ष वेधून घेतलं होतं.

वैष्णवी हगवणे – कस्पटेच्या मृत्यू प्रकरणानंतर ज्या घडामोडी समोर येत आहेत, त्याने संबंध राज्याला धक्का बसला. ज्यादिवशी वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ आजी-आजोबांच्या ताब्यात आले, त्याक्षणीही अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर वैष्णवीच्या बाळाला आधी निलेश चव्हाण आणि त्यानंतर दुसऱ्या एका नातेवाईकच्या घरी ठेवण्यात आले होते. या काळात बाळाची हेळसांड झाली, असा आरोप कस्पटे कुटुंबाने केला होता. सध्या हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे असून या बाळात आता ते आपली मुलगी शोधत आहेत.

१६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार झाले होते ज्यांना आठ दिवसांनी अटक करण्यात आली. आता या प्रकरणात वैष्णवीचा सासरा, दीर, नवरा, सासू आणि नणंद यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह

वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तो विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिच्या घरातल्यांनी थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वैष्णवीच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं. पोलीस तक्रारही केली होती.