व्हॅलेंटाईन डे जवळ आला की, अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन येतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तींना भेटवस्तू देतात. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, घड्याळे आणि इतर गॅझेट्सची मागणी वाढते. याच वेळी अ‍ॅपलनेही भारतात आपल्या काही गोष्टींवर व्हॅलेंटाईन डुनिमित्त खास ऑफर ठेवली आहे. या ऑफर्समुळे नवीन आयफोन, मॅकबूक किंवा अ‍ॅपलचे इतर प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरू शकते.

अ‍ॅपलने आपल्या इंडिया वेबसाइटवर आयफोन १७ सीरिज, मॅकबुक एयर, मॅकबुक प्रो, आयपॅड, एयरपोडस आणि अ‍ॅपल वॉच यांसारख्या अनेक गॅझेट्ससाठी बँक कॅशबॅक ऑफर्स सुरू केल्या आहेत. कंपनी थेट किंमत कमी करत नाही; पण निवडक बँक कार्डद्वारे कॅशबॅक देत असल्यामुळे ग्राहकांना अंतिम किंमत कमी पडते.

लॅपटॉपचं सांगायला गेलं, तर मॅकबुक एयर M4 वर सध्या १० हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक दिलं जात आहे. भारतात १३-इंच मॅकबुक एअरची सुरुवातीची किंमत ९९,९०० रुपये होती; पण या ऑफरनंतर हे साधन ८९,९०० रुपयांत मिळू शकते. हे कॅशबॅक ICICI, Axis व American Express कार्डवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मॅकबुक प्रोच्या काही मॉडेल्सवरही १० हजार रुपयांची कॅशबॅक दिली जाणार आहे. १४-इंच मॅकबुक प्रोची प्रभावी किंमत १,५९,९०० रुपये होते; तर १६-इंच M4 प्रो मॉडेल २,३९,९०० पर्यंत मिळेल.

व्हॅलेंटाईन डे निमित्त अ‍ॅपलने काही प्रॉडक्ट्सवर ऑफर्स देऊ केल्या आहेत; पण काही रिटेल स्टोअर्समध्ये अजून चांगल्या डील्स मिळत आहेत. उदाहरणार्थ- Vijay Sales येथे MacBook Air M4 सुमारे ८४,९९० रुपयांत मिळू शकते (बँक ऑफरसह). आयफोन १७ प्रो वर पाच हजार रुपयांची कॅशबॅक मिळून, तो सुमारे ७७,९०० रुपयांत मिळू शकतो. आयफोन १६ व १६ प्लसवर चार हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. अ‍ॅपल वॉच , एयरपॉड्स व ईपेड मॉडेल्सवरही कॅशबॅक ऑफर्स आहेत. खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि स्टोअर्समधील किमतींची तुलना केल्यास जास्त फायदा होऊ शकतो.