scorecardresearch

वंदे भारत एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…, महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक Video पाहाच

सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Vande Bharat Express Train
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या नावारती आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo : Twitter)

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या नावारती सोमवरी आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे, ती म्हणजे त्यांनी प्रथमच सेमी-हाय स्पीड ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सोलापूर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालवली. याबाबतची माहीती मध्य रेल्वेने ट्विट करत दिली होती. अशातच आज सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जो मध्य रेल्वेने ट्विट केला आहे. ज्यामध्ये केबीनमधून दिसणारा अद्भुत नजारा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस १३ मार्च रोजी सोलापूर स्थानकातून नियोजित वेळेवर सुटली आणि ती मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर पाच मिनिटे लवकर पोहोचली. तर ४५० किमीचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल यादव यांचा सीएसएमटी स्टेशनवर सत्कारही करण्यात आला होता.

हेही पाहा- धावत्या कारमधून नोटांचा पाऊस; भररस्त्यावर पैसे फेकणाऱ्या तरुणाचा Video पाहून व्हाल थक्क

वंदे भारत नारी शक्तीच्या हातात –

हेही पाहा- video viral : भर रस्त्यात ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये चालकाची स्टंटबाजी, अतिशहाणपणा पाहून भडकले यूजर्स

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत वंदे भारत – नारी शक्तीच्या हाती, असं लिहिलं आहे. शिवाय पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवल्याची माहितीदेखील रेल्वे मंत्र्यांनी १३ मार्चला दिली होती. अशातच आज पुन्हा रेल्वेने सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो आपणाला थक्क करणारा आहे. मागील १० फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर प्रथमच या वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी केले. यामुळे मध्य रेल्वेच्या शिरपेचात त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.

लोको पायलटचे काम काय?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन मार्गांवर लोको पायलटिंगमध्ये विस्तृत अभ्यास करावा लागतो आणि रेल्वे प्रवासादरम्यान चालकाला प्रत्येक क्षणी सतर्क राहावे लागते. चालक शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नलिंग, नवीन उपकरणे हाती घेणे, इतर क्रू मेंबर्सशी समन्वय साधणे, ट्रेन धावण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 12:40 IST