Vande Bharat Shocking Reel Video : सध्या सोशल मीडियावर व्ह्युज आणि लाइक्सचे फॅड प्रचंड वाढलेय. परंतु, आता लोक देशातील हायटेक वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुरक्षेशीही खेळ करताना दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामध्ये एक महिला आणि पुरुष वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलट केबिनमध्ये बसून बिनधास्त रील बनविताना दिसत आहे. ट्रेनचा हा भाग अत्यंत सुरक्षित आणि प्रतिबंधित मानला जातो, जिथे सर्वसामान्य लोकांना जाण्यात सक्त मनाई आहे. पण, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीवर रील बनवल्याचा आरोप
‘एक्स’वर प्रेम भारद्वाज नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर करीत या महिलेची ओळख ‘सरिता यादव’ अशी सांगितली आहे. आरोप आहे की, ही महिला आपल्या कुटुंबासह वंदे भारतच्या केबिनमध्ये घुसली आणि तिने लोको पायलटच्या मुख्य खुर्चीवर बसून एकामागून एक रील शूट केल्या. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने रेल्वे प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करीत लिहिले, “आजकाल सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नींना रील बनवण्याचे असे वेड लागले आहे की, त्या परिणामांचा काहीही विचार करत नाहीत.” त्यांनी असा इशाराही दिला की, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे ट्रेनमधील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय रेल्वेच्या ‘रेल्वे सेवा’ या अधिकृत तक्रार पोर्टलने याची दखल घेतली आहे. रेल्वे सेवेने कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देत तक्रारदाराकडून ट्रेन नंबर, तारीख, वेळ आणि मोबाईल नंबर यांसारखी संपूर्ण माहिती मागितली आहे, जेणेकरून प्रकरणाची चौकशी सुरू करता येईल. दरम्यान, ज्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रील पोस्ट करण्यात आली होती, ते अकाउंट आता गायब झाल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. तिथे आता ‘पेज नॉट फाऊंड’ (Page Not Found) असे दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन, कारवाईच्या भीतीने संबंधितांनी अकाऊंट डिलीट किंवा डीॲक्टिव्हेट केल्याचे दिसते आहे.
‘इंजिनमध्ये एन्ट्री कशी मिळाली?’ संबंधितांवर कारवाईची मागणी
या घटनेबाबत इंटरनेटवर लोकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. युजर्सचे म्हणणे आहे की, जर ट्रेनच्या केबिनमध्ये लोको पायलटशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला जाण्यास मनाई आहे, तर मग या लोकांना आत जाण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली? आता लोक रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करीत आहेत की, ???ट्रेन चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि सुरक्षा प्रोटोकॉल तोडणाऱ्यांवर (की- या लोकांचा जीव धोक्यात आणणाऱ्या या बेजबाबदार कृतीबद्दल संबंधित लोको पायलट कर्मचारी आणि सुरक्षा प्रोटोकॉल तोडणाऱ्या व्यक्तींवर)??? कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
