Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या वारी सुरू आहे, त्यामुळे वारीतील व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता वारीतील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी वारकऱ्यांबरोबर नाचताना दिसत आहे.
वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणांहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. अशातच ते पंढरपूरला जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच पारंपरिक नृत्य करताना दिसतात. आता असाच एक सुंदर व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका तरुणीने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून यावेळी ती वारीतील वारकऱ्यांबरोबर टाळ, चिपळीच्या तालावर नाचताना दिसत आहे. यावेळी वारकरीदेखील त्याच उत्साहात आणि आनंदात नाचताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sayali_patil941 या अकाउंटवर शेअर केला असून, याला आतापर्यंत नऊ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘छान नाचला’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘खूप सुंदर माऊली…राम कृष्ण हरी’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘अंग भरून कपडे आपली संस्कृती जपते आहे, अजून काय पाहिजे..’