Vegetable Seller Video : तुमच्यापैकी अनेक जण स्टेशनजवळील भाजी मार्केटमधील विक्रेत्यांकडून भाज्या, फळं खरेदी करतात. पण, अशा विक्रेत्यांकडून भाज्या खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगा. विशेषत: फळं आणि भाज्यांचे वजन करताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे. कारण विक्रेते कधी कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतील सांगता येत नाही. सोशल मीडियावर ग्राहकांच्या फसवणुकीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात विक्रेता जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अनेकांनी विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत असल्याचे दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती त्याच्याकडे टोमॅटो विकत घेण्यासाठी येतो आणि तो स्वत: टोमॅटो निवडतो आणि ते वजन करण्यासाठी विक्रेत्याकडे देतो. यावेळी ग्राहकाचे लक्ष नसताना विक्रेता त्याने आधीच वजन करून ठेवलेल्या टोमॅटोची पिशवी ग्राहकाला देतो, जे ग्राहकाच्याही लक्षात येत नाही. ग्राहकाचे लक्ष नसताना तो अतिशय चलाखीने टोमॅटोच्या पिशव्यांची अदलाबदली करतो आणि ग्राहकाला आधीच करून ठेवलेली पिशवी देतो. विक्रेत्याने चलाखीने केली ग्राहकाची फसवणूक विक्रेत्याने एकतर ते टोमॅटो खराब असतील म्हणून ते ग्राहकाला दिले असतील किंवा टोमॅटोच्या वजनात छेडछाड केली असेल, असा अंदाज बांधला जात आहे. पण, अनेक भाजी विक्रेते अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात, त्यामुळे रस्त्यांवर भाजी विकत घेताना काळजी घ्या. Read More News On Trending- मामीचा जडला भाचीवर जीव! तीन वर्षांच्या अफेअरनंतर पळून जाऊन केले लग्न अन्…; वाचा अजब प्रेमकहाणी "गरीबांबरोबर असा वागशील तर तू कधीच श्रीमंत होऊ शकत नाही'' युजर्सच्या कमेंट्स हा व्हिडीओ @jamre08 या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, गरीब गरिबांना लुटत आहेत. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, भावा, गरीबांबरोबर असा वागशील तर तू कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, याच गोष्टीमुळे तो आयुष्यभर भाजी विकतोय.