scorecardresearch

शिकारीसाठी विषारी साप घुसला घरट्यात, पक्ष्यांच्या जोडीनेही दिलं चोख प्रत्युत्तर; बघा Viral Video

एक धोकादायक साप पक्ष्यांच्या घरट्यात घुसून त्याच्या पिलांची शिकार करत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

sanke fight with birds
व्हायरल व्हिडीओ (फोटो: rasal_viper / Instagram )

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सतत येत राहतात, त्यापैकी कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होतो याचा अंदाज लावता येत नाही. सध्या अनेक भयावह व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यात बहुतेक जंगलातून आलेले दिसत आहेत. सहसा, जंगलात राहणारे भयानक प्राणी पोटाची खळगी भरण्यासाठी इतर कोणत्याही प्राण्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारायला अजिबात चुकत नाहीत.

अशा स्थितीत वन्य प्राण्यांच्या निर्दयी शिकारीच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. नुकतेच सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. सध्या, एक धोकादायक साप पक्ष्यांच्या घरट्यात घुसून त्याच्या पिलांची शिकार करत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

(हे ही वाचा: IPL 2022: स्टेडियममध्ये मॅचदरम्यान जोडप्याने केलं ‘किस’! ट्विटरवर आला मीम्सचा पूर)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घनदाट जंगलात एका काटेरी झाडावर एक विषारी साप पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करताना दिसत आहे. पक्षी सहसा जंगलातील भक्षक प्राण्यांपासून घरटे सुरक्षित ठेवण्यासाठी झाडांच्या सर्वात उंच फांद्यांवर घरटी बनवतात. त्याचवेळी व्हिडीओमध्ये साप उंची गाठून घरट्यात घुसून शिकार करताना दिसत आहे. या दरम्यान पक्ष्यांची जोडी आपल्या निर्दयी मुलांना वाचवण्यासाठी सापाला धैर्याने तोंड देताना दिसत आहे. पक्षी आपल्या चोचीने सापाच्या शरीरावर वळसा घालून हल्ला करताना दिसतात. यादरम्यान साप जखमी होऊन पळताना दिसतो.

(हे ही वाचा: ‘या’ पक्ष्याने काही सेकंदात गिळला जिवंत ससा! Video Viral पाहून नेटीझन्स झाले हैराण)

(हे ही वाचा: उद्यानात सापावर मांजरीने केला हल्ला, Viral Video ची सोशल मिडीयावर होतेय चर्चा)

व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Venomous snake enters a nest for hunter pair of birds responds sharply watch viral video ttg