Indigo Airhostess Surprises Parents On Flight Video : शाळा, कॉलेज, ऑफिसमधून घरी येईपर्यंत सतत कॉल करणारे, सकाळी वेळेच्याआधी उठून डब्बा करून देणारे, सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ झोपू देणारे, चारचौघांत तुमची झालेली ओळख पाहून गर्वाने हे आपलं मूल आहे असे सांगणारे आई-बाबाच असतात. पण, त्यांना या बदलत्यात तुम्ही कष्टाने कमवून आणलेला पैसा किंवा तुमची ओळख नाही तर तुम्ही दिलेला सन्मान त्यांच्यासाठी लाखमोलाचा असतो. तर आज असेच काहीसे दृश्य दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ विमानातील आहे. इंडिगो एअरहोस्टेस पारमिता रॉय हिने आई-बाबांचा व्हिडीओ शेअर केला आहे. पारमिता रॉयचे पालक विमानात प्रवेश घेतात. लेक त्यांना सरप्राईज द्यायला लपून एका कोपऱ्यात उभी राहते. पहिल्यांदा आई येते, तेव्हा ती पाया पडून तिचे स्वागत करते. त्यानंतर विमानात बाबांची एंट्री होते, मग ती बाबांच्यासुद्धा पाया पडते. आई-बाबा याच विमानात येणार याची कदाचित पारमिताला कल्पना असते, त्यामुळे आई-बाबांचे असे खास स्वागत करण्याचे लेक ठरवते.

हा व्हिडीओचा बेस्ट पार्ट होता (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, मुख्य केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या पारमिता रॉयने तिच्या पालकांचे खूप सुंदररित्या विमानात स्वागत केले. मुख्य केबिन क्रू म्हणून केलेले स्वागत आणि लेक म्हणून दिलेला मान-सन्मान आई-बाबांनासुद्धा आवडला आणि लेकीला केबिन क्रूच्या गणवेशात बघून आई-बाबांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले, याचे समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होते. लेकीने विमानात आई-बाबांचे कसे स्वागत केले, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ms.parmita या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा माझे आवडते प्रवासी विमानात येतात, हा क्षण मी कायम जपून ठेवेन”; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून कौतुक करत आहेत आणि “काका-काकूंचा गर्व त्यांच्या डोळ्यात दिसतो आहे”, “यालाच म्हणतात आई-बाबांचं नाव मोठं करणे”, “जेव्हा तू आई-बाबांच्या पाया पडलीस, तोच व्हिडीओचा बेस्ट पार्ट होता”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.